Maharashtra Shahir: भरत-अंकुश-केदार यांची पुन्हा सुरु झाली दुनियादारी; महाराष्ट्र शाहीर निमित्त तिघे एकत्र

Bharat Jadhav, Ankush Chaudhari: केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी 'बहराला हा मधुमास'वर थिरकताना दिसत आहेत.
Bharat Jadhav, Ankush Chaudhari and Kedar Shinde Dance On song from movie Maharashtra Shahir
Bharat Jadhav, Ankush Chaudhari and Kedar Shinde Dance On song from movie Maharashtra ShahirSaam TV

Maharashtra Shahir Viral Song: दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपटाची बरीच चर्चा आहे. थोर लोकशाहीर कृष्णराव गणपत साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महाराष्ट्र शाहीर असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील 'बहराला हा मधुमास' हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

Bharat Jadhav, Ankush Chaudhari and Kedar Shinde Dance On song from movie Maharashtra Shahir
Bharti Singh: प्राण्यांच्या उपमा द्यायचे..., बॉडी शेमिंगमुळे ट्रोल झालेली भारती अखेर बोलली

या ट्रेंडमध्ये मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील थिरकताना दिसत आहेत. केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी या तीन मित्रांनी या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंकुश चौधरीने त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यावर तिघेही खूप गोड डान्स स्टेप करत आहेत. कोरिओग्राफर कृती या तिघांना डान्स शिकवत आहे. तर हे तिन्ही कलाकार तिला डान्स करताना फॉलो करत आहेत.

या तिघांसोबत महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आणि केदार शिंदे यांची मुलगी सना देखील डान्स करताना आणि फुल उडवताना दिसत आहे.

महाराष्ट्र शाहीर निमित्त भरत, अंकुश आणि केदार पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हे त्रिकुट पडद्यावर धम्माल करणार याची सर्वांना खात्री आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com