Ata Thambaycha Naay : वास्तविक जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट; 'आता थांबायचं नाय!' चा दमदार पोस्टर प्रदर्शित

Ata Thambaycha Naay Marathi Movie : सिद्धू आणि भरत जाधवची भन्नाट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला 'आता थांबायचं नाय !' या चित्रपटाच्या निमित्ताने येणार आहे. या चित्रपटात दमदार पोस्टर रिलीझ करण्यात आला आहे.
Ata Thambaycha Naay Marathi Movie
Ata Thambaycha Naay Marathi MovieSaam Tv
Published On

Ata Thambaycha Naay Marathi Movie: झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित, शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले . पोस्टर पाहून आपल्याला समजेल की या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे.

या पोस्टरमध्ये अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार दिसत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या यशाची कहाणी लिहताना माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हा तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Ata Thambaycha Naay Marathi Movie
Malaika Arora: ती तयारी करत होती अन्...; मलायका अरोराच्या लिव्हिंग रूममध्ये शिरला वेडा चाहता, नेमकं काय घडलं?

'आता थांबायचं नाय!' या सिनेमाच्या पोस्टरवर सर्वांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणि काहीतरी मिळवल्याचा , विजयाचा आनंद पाहू शकतो पण त्या हसण्यामागे किती संघर्ष आहे हे येत्या १ मे ला सिनेमागृहात कळेल. चित्रपटाची गोष्ट नक्की काय असणार, चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेप्रेमींना मल्टिस्टारर चित्रपटाचं वेड आहे, त्यात खूप दिवसांनी प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित सिनेमा येणार असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरणार आहे.

Ata Thambaycha Naay Marathi Movie
Swapnil Joshi: यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी ठरला खास; 'या' कारणामुळे नव वर्षाची सुरुवात होणार धमाल

'आता थांबायचं नाय!' हा सिनेमा भावनिक आणि मनोरंजक असल्याबरोबरच प्रेरणादायक आणि मनोबल वाढवणारा आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया निर्मित मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com