

Tumhe Kitna Pyaar Karte Song: वरुण धवन आणि जान्हवी कपूर ही जोडी पहिल्यांदाच 'बवाल' चित्रपटातून एकत्र झळकणार आहे. 'बवाल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लगेचच चित्रपटातील एक गाणंही प्रदर्शित करण्यात आले आहे.
वरुण-जान्हवीची केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. रविवार, ९ जुलैला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लगेचच १० जुलैला चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मागच्या आठवड्यात चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. टीजरमध्ये अरजित सिंगच्या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहे.
'बवाल' चित्रपटातील 'तुम्हे कितना प्यार करते' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यात सर्वात आधी वरुण धवन आणि जान्हवी कपूरची केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण नंतर मात्र त्यांच्यात खूप काही बिनसलेलं दिसत आहे. दोघेही त्यांचे भूतकाळातील चांगल्या आठवणी आठवताना दिसत आहे. त्यामुळे गोड प्रेमकहाणी वाईट वळण घेताना दिसत आहे.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे अखंड प्रेमात बुडालेले वरुण-जान्हवी नंतर एकमेंकांशी खूप भांडताना दिसतात. तसंच काहीस या गाण्यातही दाखवण्यात आले आहे.त्यामुळे चित्रपटात नक्की काय घडलंय? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हे गाणं मिथून आणि अरजित सिंगने गायलं आहे. गाण्याचे बोल मनोज मुंतशिर यांनी लिहले आहेत. हे गाणं टी-सीरीजच्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.हे गाणं प्रदर्शित होऊन फक्त काही तासच झाले आहे.तर गाण्याला हजारोंमध्ये व्ह्यूज आले आहेत.
वरुण-जान्हवीचा 'बवाल' हा चित्रपट २१ जुलैला अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर वरुण सध्या त्याच्या आगामी वेबसीरीज 'सिटाडेल'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.त्याची ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जान्हवी कपूर लवकरच 'देवरा' आणि 'जन गण मन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.