Singer Passed Away: असमिया संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका गायत्री हजारिका यांचे 16 मे 2025 रोजी गुवाहाटी येथील नेमकेअर रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय 44 वर्षे होते. त्यांनी दीर्घकाळ कोलन कॅन्सरशी झुंज दिली. त्यांच्या निधनामुळे असमच्या सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
गायत्री हजारिका यांनी "झोरा पाटे पाटे फागुन नामे" या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या आवाजातील पारंपरिक असमिया संगीताला आधुनिकतेची जोड देण्याची शैली प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यांनी "रति रति मोर झून" आणि "ओहर दोरे उभोटी आतोरी गोला" यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी गायली.
गायत्री हजारिका यांचे शिक्षण गुवाहाटीतील टीसी हायस्कूल आणि हांडिक गर्ल्स कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या रवींद्र भारती विद्यापीठ आणि लखनौच्या भातखंडे संगीत महाविद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी 11 व्या वर्षी गायनाची सुरुवात केली आणि 2014 मध्ये "झोरा पाटे पाटे फागुन नामे" या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या.
त्यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. तसेच, असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि त्यांच्या संगीत योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या निधनामुळे असमिया संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.