'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटामुळे अभिनेत्री अश्विनी बागल हिला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. यानंतर अभिनेत्री आता अक्षय सेठीसोबत 'तुमसे मिलु अपनी कहूं' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसत आहे. या म्युझिक व्हिडिओच्या दिग्दर्शनाची धुरा सोनम शाह यांनी उत्तमरीत्या संभाळलीय.(Latest News)
डीओपी आदित्य मेहरने याने या गाणे शुट केले आहे. या गाण्याला गायिका रितिका राज सिंगने आवाज दिला असून सतीश त्रिपाठी यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. याबाबत बोलताना अश्विनी म्हणाली, "मला या म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी अश्विन महाराज यांची आभारी आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज झालेले हे गाणे दोन रसिकांच्या हृदयाला भिडेल याची मला खात्री आहे."अश्विन महाराज यांनी संगीतबद्ध केलेले आणि सादर केलेले हे गाणे 'महाराज म्युझिक'च्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनवणारे गाणे
आर्या आंबेकरच्या 'चोरू चोरून' गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेमदिवसाचं औचित्य साधतं ‘फतवा’ सिनेमातील ‘चोरू चोरून’ गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत यांचं 'चोरू चोरून' फिमेल वर्जन गाणं ( नुकतच प्रदर्शित झालं आहे.
दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. 'चोरू चोरून' गाण्याचं संगीत दिग्दर्शन संजीव-दर्शन यांनी केले असून आकर्षक गीतरचना डॉ. विनायक पवार यांनी लिहिली आहे. या गाण्यात अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.