Asha Bhosale: ‘हा पुरस्कार महाराष्ट्राचा... ’; आशाताई ‘महाराष्ट्र भूषण’ स्विकारताना गहिवरल्या

शुक्रवारी संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Asha Bhosale Maharashtra Bhushan
Asha Bhosale Maharashtra BhushanSaam Tv

Asha Bhosale Maharashtra Bhushan: शुक्रवारी संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक दिग्गज मंडळी सोहळ्याला उपस्थित होते. राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle Latest News) यांना प्रदान करण्यात आला.

Asha Bhosale Maharashtra Bhushan
Nilu Kohli: अभिनेत्री निलू कोहलीवर कोसळला दुःखाचा डोंगर

यावेळी पुरस्कार वितरण पुरस्कार सोहळ्याला राज्यातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोहळ्याला उपस्थित होते.

Asha Bhosale Maharashtra Bhushan
Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल! अल्पावधीत मिळवले लाखो व्ह्यूज

यावेळी आशा भोसले पुरस्कार स्विकारताना म्हणतात, मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्याची भावना माझ्या मनात आज आहे. महाराष्ट्रात आल्यावर एक वेगळीच भावना असते. दहा वर्षांची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं. मी यापुढेही गात राहणार. मला असे वाटतं की, महाराष्ट्र भुषण हा मला भारतरत्नासारखा आहे. माझ्या घरातून मिळालेला पुरस्कार आहे. मी ९० वर्षांपर्यत थांबले आहे.

मी फक्त मराठी नाहीतर अवघ्या महाराष्ट्राची कन्या आहे. मला मिळालेल्या यशात सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. दत्ता डावखरे, सुधीर फडके, वसंत प्रभु, वसंत पवार, पु.ल. देशपांडे, श्रीनिवास खळे, हदयनाथ मंगेशकर यांसारख्या संगीतकारांबरोबर मला गाण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com