Akshay Waghmare: मुलगी झाली हो...! अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी दुसऱ्या कन्यारत्नेचं आगमन

Akshay Waghmare And Yogita Gawli: अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला आहे. “पोरगी झाली रे” म्हणत अक्षयनं खुशखबर शेअर केली आहे.
Akshay Waghmare And Yogita Gawli
Akshay Waghmare And Yogita GawliSaam Tv
Published On

Akshay Waghmare And Yogita Gawli: मराठी अभिनेता अक्षय वाघमारे आणि त्याची पत्नी योगिता गवळी यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचा क्षण आला आहे. योगितानं आज दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. २०२१ मध्ये त्यांना,पहिला कन्यारत्नाने कुटुंबात आनंद फुलला होता. आता पुन्हा एकदा कन्यारत्न झाल्याची खुशखबर अक्षयने स्वतः सोशल मीडियावर शेअर करत “पोरगी झाली रे…” असे लिहित आनंद व्यक्त केला. या खास क्षणाचे फोटोदेखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अक्षय आणि योगिता यांना पहिलं अपत्य २०२१ मध्ये झालं होतं. आता दुसऱ्या कन्येच्या आगमनामुळे त्यांचे कुटुंब अधिक सुखी आणि पूर्ण झाले आहे. त्यांच्या या आनंदात मित्र-परिवारासह चाहत्यांनीही भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर ‘कन्यारत्नाच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा’ अशा कमेंट्सचा ओघ सुरू आहे.

Akshay Waghmare And Yogita Gawli
Bads of Bollywood: समीर वानखेडे यांच्या याचिकेला नेटफ्लिक्सचा विरोध; 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' विरोधात केला होता उच्च न्यायालयात अर्ज

योगिता गवळी ही कुख्यात राजकीय व्यक्तिमत्त्व अरुण गवळी यांची कन्या आहे, तर अक्षय वाघमारे हा मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. दोघांचे लग्न ८ मे 2020 रोजी झाले होते.

Akshay Waghmare And Yogita Gawli
Malaika Arora: मलायका अरोरा ज्याच्या प्रेमात पडली; तो हर्ष मेहता आहे कोण?

या नव्या पाहुण्याच्या आगमनाने गवळी आणि वाघमारे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. बाळ आणि आई दोघीही ठिक असून कुटुंबीयांना आनंदाचा हा क्षण मनापासून साजरा करताना पाहायला मिळत आहे. नवीन बाळ त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो अशा शुभेच्छा चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com