Anupam Kher: अनुपम खेर काली चरणी लीन, परम मित्रासाठी केली खास प्रार्थना

अनुपम खेर यांनी कोलकाता येथे आगमन झाल्यावर कालीघाट मंदिराला भेट दिली.
Anupam Kher Share Video From Kolkata
Anupam Kher Share Video From Kolkata Saam TV
Published On

Anupam Kher Video: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी रविवारी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अनुपम खेर एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईहून कोलकाताला गेले आहेत. भाजपचा कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुपम खेर यांनी कोलकाता येथे आगमन झाल्यावर कालीघाट मंदिराला भेट दिली आणि माँ कालीची दर्शन देखील घेतले.

कालीघाट मंदिर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळ आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर अनुपम यांनी प्रतिक्रिया देखील दिली. “इथे येऊन खूप छान वाटले. देशाच्या एकात्मतेसाठी मी देवीकडे प्रार्थना केली. मी माझा मित्र सतीश कौशिकच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थनाही केली. जय मां काली."

Anupam Kher Share Video From Kolkata
Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाची बॉक्स ऑफिस यशस्वी कामगिरी; अवघ्या काही दिवसात पार केला ५० कोटींचा टप्पा

रविवारी होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनुपम खेर कोलकात्यात गेले आहेत. याशिवाय ते सोमवारी शांतीनिकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत.

अनुपम खेर यांनी यावेळी मरून रंगाचा लांब बाह्यांचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होते. अभिनेत्याला पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी झाली होती. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये अनुपम खेर कालीघाट मंदिर परिसरात हात जोडून फिरताना दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात अनेक फुलांच्या मला आणि कपाळावर गंध आहे .

काली मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनुपम खेर म्हणाले, “आज मी कालीघाट मंदिरात माँ कालीच्या दर्शनासाठी आलो आहे. सर्व चाहत्यांची भेट घेतली. मी सर्वांसाठी प्रार्थना केली. मी माझा मित्र सतीश कौशिकसाठी प्रार्थना केली. मला इथे आल्याबद्दल कृतज्ञता वाटते. देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी प्रार्थना केली,'' असे अनुपम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे.

अनुपम खेर यांची पत्नी अभिनेत्री किरण खेर भाजपाची सदस्य आहे. अनुपम अभिनीत 'द काश्मीर फाइल्स' काश्मीरी विद्वानांच्या हत्येवर आधारित चित्रपट केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते, असा आरोप विरोधकांनी केला केला आहे.

सोमवारी विश्व भारती विद्यापीठात फक्त काश्मीर फाइल्स या चित्रपटावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. विश्व भारती विद्यापीठातील वातावरण सध्या दूषित झाले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंवर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीसाठी विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com