Tu Jhoothi Main Makkaar 4th Day Office Collection: बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि श्रद्धा कापुर यांचा चित्रपट होळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात, हे आपण सगळे जाणतो. मात्र श्रद्धा-रणबीर चित्रपट आठवड्याच्या मध्येच म्हणजे बुधवारी प्रदर्शित झाला. धुलीवंदनाच्या दिवस असला तरी प्रेक्षक चित्रपट बघण्यासाठी घराबाहेर पडणार का, हा प्रश्न सर्वांसोमर होता.
धूलिवंदनच्या दिवशी बुधवारी प्रदर्शित होऊन देखील चित्रपटाने चांगली कामगिरी केली. तरीही वीकेंडला चित्रपट अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. लव रंजन दिग्दर्शित, या चित्रपटात बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकेत आहे. लव रंजनसाठी हा रोम-कॉम चित्रपट महाग ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
कार्तिक आर्यन आणि नुश्रत भरुच्चा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सोनू के टीटू की स्वीटीच्या नंतर लव रंजनच्या पुढील चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. दिग्दर्शकासाठी भाग्यवान ठरलेल्या या जोडीने 'तू झुटीं मै मक्कर'मध्ये देखील कॅमिओ देखील केला आहे.
'तू झुटीं मै मक्कर' चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. पाहूया या चित्रपटाने चौथ्या दिवशी किती चांगली कमाई केली आहे ते. सुरुवातीच्या आकड्यानुसार चित्रपटाच्या कमाईमध्ये पहिल्या शनिवारी प्रगती दिसली.
चित्रपट समीक्षक तारण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार चौथ्या दिवशी या चित्रपटाने १६.५७ कोटींची कमाई केली. तर आज दुपारी ३ पर्यंतच्या आकड्यांनुसार चित्रपटाचे भारतातील कलेक्शन ५.४० कोटी आहे.
आठवड्याच्या मधेच चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खेचून आणणे तसे कठीण असते. पहिल्या दिवसाच्या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, तू झुठी मैं मक्कारने 15.73 कोटींची कमाई केली, दुसऱ्या दिवशी 10.34 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 10.52 कलेक्शन केले.
'तू झुठी में मक्कर' प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसात एकूण 36.59 कोटीचे कलेक्शन केले आहे. नवीन आकड्यांनुसार चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 50.59-52.59 कोटी असेल असे सांगितले जात आहे.
आज 'तू झुठी में मक्कार' चित्रपट 14-16 कोटी आणि त्याहून अधिक कमाई करण्यात यशस्वी झाला, तर पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा एकदा पार करेल, हे एक चांगले लक्षण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.