Anil Kapoor : 'अशी विचारसरणी असती तर 'शोले'... '; बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल असं का बोलले अनिल कपूर, वाचा सविस्तर

Anil Kapoor : अनिल कपूरने चित्रपटसृष्टीबाबत नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. सध्याच्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मानसिकतेबद्दल अनिल कपूर यांनी भाष्य करत अनेक विचार मांडले आहेत.
Anil Kapoor
Anil Kapoor Saam TV
Published On

Anil Kapoor : अनिल कपूर 90 च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. लवकरच ते 'सुभेदार' या नव्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्याला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. अलीकडेच, आपल्या जुन्या चित्रपटांबद्दल बोलताना, अभिनेत्याने आजच्या कलाकारांबद्दल मोठा खुलासा केला आहे. आजच्या काळात एक अभिनेता दुसऱ्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करण्यास टाळाटाळ करतो असे त्यांनी सांगितले आहे.

आपल्या जुन्या चित्रपटांची आठवण करून देताना अनिल कपूरने 'एके वर्सेस एके' या चित्रपटाचा उल्लेख केला. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अनुराग कश्यप देखील अनिल कपूरसोबत होता. हा चित्रपट एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवणे यांनी केले आहे. अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा त्याने हा चित्रपट साइन केला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले, त्यापैकी एक त्यांच्या 'ॲनिमल' चित्रपटाचा दिग्दर्शक होते.

Anil Kapoor
Ram Charan : राम चरणला दिली 'गेम चेंजर'च्या ट्रेलरसाठी धमकी, चाहत्यानेच लिहिले 'RIP लेटर'

संदीप रेड्डी वंगा आश्चर्यचकित झाले

अनिल कपूर यांनी सांगितले की जेव्हा संदीप रेड्डी वंगा यांना हे समजले तेव्हा त्यांना धक्का बसला, त्यांनी सांगितले की अशा चित्रपटांमुळे स्टारडम संपुष्टात येऊ शकतो, ज्यामध्ये इतर कलाकारांचा सहभाग आहे. ते म्हणाले की लोकांसाठी फी देखील एक मोठा घटक आहे. स्वत:बद्दल बोलताना ते म्हणाले की, सर्वच प्रकल्प पैशासाठी होत नाहीत. तर आवड म्हणून ते काही चित्रपटात काम करतात.

Anil Kapoor
Mufasa: The Lion King : 'मुफासा'ची कमाई 'पुष्पा 2' पेक्षा कमी, तरीही शाहरुख खानच्या चित्रपटाची जगभर चर्चा

एकत्र काम करू इच्छित नाही

यावेळी अभिनेत्याने 'स्लमडॉग मिलेनियर'चा उल्लेख केला. ते म्हणाला की मी स्वत:ला भाग्यवान समजतो कारण मला त्या चित्रपटाचा भाग होता आले. या चित्रपटात काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाल्याचेही अनिल कपूर यांनी सांगितले. नव्या पिढीतील कलाकारांबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले की, आजच्या काळात मुख्य कलाकार एकमेकांसोबत काम करताना खूप संकोच करतात. 'शोले'बद्दल बोलताना अभिनेते म्हणाले की, जर पूर्वीही कलाकारांनी असा विचार केला असता तर 'शोले'सारखा क्लासिक चित्रपट कधीच बनला नसता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com