Dharmarakshak Mahaveer chhatrapati Sambhaji Maharaj मध्ये आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या दमदार भूमिकेत; लूक आला समोर

Dharmarakshak Mahaveer chhatrapati Sambhaji Maharaj: 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या आगामी मराठी चित्रपटात कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आनंद पिंपळकर दिसणार आहेत.
Dharmarakshak Mahaveer chhatrapati Sambhaji Maharaj
Dharmarakshak Mahaveer chhatrapati Sambhaji MaharajSaam Tv
Published On

महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सचा भव्य आणि बिग बजेट "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन भागात असणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

Dharmarakshak Mahaveer chhatrapati Sambhaji Maharaj
Sayali Sanjeev Post: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचा मनसेला पाठिंबा; अमित ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली..

सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत. धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त व छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आनंद पिंपळकर दिसणार आहेत. यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत, तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंदजी सांगतात, ‘आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या चित्रपटातल्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेचा भाग होता आल्याचं खूप समाधान आहे. वेगळेपण व विशेष लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे, प्रेक्षकांना ती नक्की आवडेल अशी आशा आहे.

Dharmarakshak Mahaveer chhatrapati Sambhaji Maharaj
Drashti Dhami: लक्ष्मी आली! प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, वयाच्या ४० व्या वर्षी गोंडस मुलीला दिला जन्म

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com