Amruta Khanvilkar : "आलेच मी...", सईच्या गाण्यावर अमृतानं धरला ठेका; 'चंद्रा'ची कातिल अदा पाहून चाहते फिदा, पाहा video

Amruta Khanvilkar Lavani : अमृता खानविलकरने सई ताम्हणकरच्या "आलेच मी" या गाण्यावर ठसकेबाज लावणी केली आहे. अमृताच्या या डान्सवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Amruta Khanvilkar Lavani
Amruta KhanvilkarSAAM TV
Published On

सध्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिची 'आलेच मी' ही लावणी सध्या सोशल मिडियावर तुफान ट्रेंड होत आहे. प्रत्येकजण यावर व्हिडीओ बनवत आहे. सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणी करताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'देवमाणूस' चित्रपटात सईने आपल्या लावणीने चारचाँद लावले आहेत. 'देवमाणूस' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता सईच्या लावणीच्या गाण्यावर चंद्रानं ठेका धरला आहे. याचा व्हिडीओ अमृता खानविलकरने सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) कोरिओग्राफर आशीष पाटीलसोबत जबरदस्त लावणी करताना दिसत आहे. तिच्या एनर्जीनं चाहत्यांना वेड लावले आहे. अमृताच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.अमृता खानविलकरच्या या डान्स व्हिडीओला चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

अमृता खानविलकरला 'चंद्रा' या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. अलिकडेच तिचे 'चिऊताई चिऊताई दार उघड' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता तिचा सई ताम्हणकरच्या "आलेच मी" या गाण्यावर केलेल्या लावणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लावणीसाठी अमृता खानविलकरने ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. मोकळे केस, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर टिकलीने तिचा लूक खूपच भारी दिसत आहे.

अमृता खानविलकरच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच कलाकारांनी देखील तिचे कौतुक केले आहे. चाहते तिच्या लावणीतील अदा पाहून घायाळ झाले आहेत. 25 एप्रिलला सई ताम्हणकरचे चक्क दोन चित्रपट रिलीज होत आहे. पहिला 'देवमाणूस' हा मराठी चित्रपट होय. दुसरा 'ग्राउंड झीरो' हा हिंदी चित्रपट होय. 'ग्राउंड झीरो' चित्रपटात ती बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Amruta Khanvilkar Lavani
Suhana Khan : 'केसरी 2'च्या प्रीमियरला शाहरुखच्या लेकीचा बोलबाला; लग्जरी घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com