Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

Amitabh Bachchan Smoking : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. जाणून घ्या काय?
Amitabh Bachchan Smoking
Amitabh BachchanSAAM TV
Published On

बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाचे लाखो चाहते जगभरात आहेत. अमिताभ बच्चन अलिकडेच 'कल्की 2898 एडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. बिग बी 'कौन बनेगा करोडपती' शो मधून ते प्रेक्षकांसोबत कनेक्ट राहतात. तसेच ते स्वतःच्या आरोग्याबाबत सजगता ठेवतात. अमिताभ बच्चन हे आता धूम्रपान आणि दारू पित नाहीत. तसेच ते मांसाहार देखील करत नाही. कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. पूर्वी एक काळ असा होता की अमिताभ बच्चन दिवसाला २०० सिगारेट ओढायचे. या बाबतचा एक किस्सा अभिनेत्याने सांगितला आहे.

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "मी धूम्रपान, मद्यपान आणि नॉनव्हेज खात नाही. हे सर्व टेस्टमुळे झाले आहे. माझ्या कुटुंबात माझी आई मांसाहारी तर वडील शाकाहारी होते. आमच्यातही तसेच आहे. जया मांस खाते. मी पूर्वी नॉनव्हेज खायचो. मद्यपान आणि धूम्रपान देखील करायचो. मात्र आत सर्व सोडून दिलं आहे." पुढे अमिताभ बच्चन म्हणाले, "तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कोलकात्यात मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो. पण ही सवय मी मुंबईत आल्यानंतर सोडली. या सवयीमुळे मला अडचणी येऊ लागल्या म्हणून काही वर्षांपूर्वी मी ही सवय सोडली.आता मला त्याची गरज नाही. फक्त जेव्हा परदेशात शूटिंग असते तेव्हा मला अडचण येते कारण तिथे शाकाहारी जेवण असते."

Amitabh Bachchan Smoking
Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

पुढे बिग बी म्हणाले की, "मी हिंसक व्यक्ती नाही. मी संयमी आहे. फक्त कॉलेजच्या दिवसांत मारामारी झाली होती. बाकी सर्व चित्रपटांसाठी केलं आहे. कारण पडद्यावरील भांडणे, मारामारी खरी वाटली पाहिजेत म्हणजे लोकांना खूप आवडतात. लोक कनेक्ट होतात."

Amitabh Bachchan Smoking
Bigg Boss Marathi : तो पुन्हा आलाय... निक्कीसाठी आणलयं स्पेशल गिफ्ट, VIDEO पाहिलंत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com