Mumbai vs Rest Of India, Irani Cup 2024: लखनऊतील एकाना स्टेडियमवर इराणी कपचा सामना सुरु आहे. ही लढत मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने ५३७ धावांची खेळी केली. या डावात मुंबईकडून सरफराज खान चमकला. सरफराजने नाबाद २२२ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रेस्ट ऑफ इंडियाने ४१६ धावांपर्यंत मजल मारली.
या सामन्याच्या चारही दिवस फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्यामुळेय या सामन्याचा निकाल लागणं जरा कठीण दिसून येत आहे. दरम्यान हा सामना जर ड्रॉ झाला, तर इराणी कपचा विजेता कोण होणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. काय आहे नियम? सोप्या शब्दात समजून घ्या.
काय आहे नियम?
इराणी कपच्या नियमानुसार, जर सामना ड्रॉ झाला तर निकाल लावण्यासाठी पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जातं. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईने ५३७ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना रेस्ट ऑफ इंडियाला ४१६ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या डावात मुंबईचा संघ आघाडीवर आहे.
रेस्ट ऑफ इंडियाने मुंबईला पछाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र या संघाला मुंबईला मागे सोडता आलेलं नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही किंवा सामना ड्रॉ झाला. तर मुंबईचा संघ इराणी कपचा विजेता ठरेल.
सामन्याचा निकाल न लागल्यामुळे आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्याची ही पहिलीच वेळ नसेल. यापूर्वी २०१८-१९ मध्ये विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये इराणी कपचा सामना रंगला होता. हा सामना देखील अनिर्णित राहिला होता. त्यावेळी विदर्भाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे विदर्भाने जेतेपदाचा मान मिळवला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.