मुंबई: दिवाळीच्या दिवशी ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड झाल्याची बातमी आल्यावर सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक हे विराजमान होणार आहेत.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान आहेत (Rishi Sunak). त्यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. काल अमिताभ बच्चन यांनी ब्रिटनचे (Britain) नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. (Social Media)
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. देशात आणि जगात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर त्यांची नजर असते. अशा परिस्थितीत जेव्हा भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान होणार आहे, तेव्हा अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया येणे साहजिक आहे. एक पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आणि ब्रिटनचा खरपूस समाचार घेतला.
बिग बींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, 'भारत माता की जय, आता ब्रिटनच्या नागरिकांना भारतातून एक नवीन आवाज, पंतप्रधान म्हणून मिळाला आहे.'
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 200 वर्षांच्या गुलामीचा आज बदला घेतला गेला आहे. तर दुसर्या यूजरने लिहिले, तुम्ही तर दोन ओळींमध्ये पूर्ण खेळ खेळलात.
ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले हिंदू आणि कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले आहेत. 28 ऑक्टोबर रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. भारतातही जल्लोषाचे वातावरण आहे. भारतावर वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचा असेल, याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.