

American Singer Singing Indian National Anthem: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले चार दिवस अमेरिका दौऱ्यावर होते. शुक्रवारी त्यांच्या दौऱ्याची सांगता झाली. एका नियोजित कार्यक्रमात अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मॅरी मिलबेन यांनी भारताचं राष्ट्रगीत गायलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडून त्यांचं अभिवादन केलं.
मेरी मिलबेन कार्यक्रमात म्हणतात, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या सांगता कार्यक्रमाचा भाग बनून या कार्यक्रमात गायला मिळालं, अभिमानाची बाब आहे. गायिकेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
३८ वर्षांच्या असलेल्या मॅरी मिलबेन (Mary Millben) या भारतातही बऱ्याच प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘ओम जय जगदीश हरे’ हे गायलेलं गाणं लाखो भारतीयांना भावलं आहे. मेरी यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमातही सहभाग नोंदवला होता.
मिलबेन म्हणतात, मी आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खूपच उत्सुक होती. मला रोनाल्ड रीगन बिल्डिंग येथे भारतीय प्रवासी कार्यक्रमात राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि मी ज्यांना माझे कुटुंब मानतो त्या देशातील नागरिकांच्या सन्मानार्थ हे राष्ट्रगीत गाण्याचा मला खूप अभिमान वाटतो. अमेरिका आणि भारताचं राष्ट्रगीत लोकशाही आणि स्वातंत्र्याबद्दल भाष्य करतात. अमेरिका आणि भारताच्या संबंधांचे हे सार आहे. एका स्वतंत्र देशाची ओळख ही तेथील स्वतंत्र लोकांमुळेच असते.
२०२० मध्ये भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय राष्ट्रगीत आणि दिवाळी सणासाठी ‘ओम जय जगदीश हरे’ हे भजन गायल्यामुळे भारतात बरीच चर्चेत आली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मिलबेन यांना ऑगस्ट २०२२ मध्ये भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मिलबेन या पहिल्या आफ्रिकन- अमेरिकन कलाकार असून ज्यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले.
अमेरिका दौऱ्याआधी पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी तेथील पंतप्रधान जेम्स मारापे यांनी देखील त्यांचे आशीर्वाद घेतले होते. जेम्स यांनी पंतप्रधानांच्या पाया पडतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.