Allu Arjun Case : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. अल्लू अर्जुनला या प्रकरणात दिलेल्या अंतरिम जामिनाला आव्हान देण्यासाठी तेलंगणा पोलीस अधिकारी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१३ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २: द रुल' चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. ४ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान, अल्लू अर्जुन आणि संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्या अचानक आगमनानंतर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. या चेंगराचेंगरीत थिएटरचा मुख्य गेट कोसळल्याने गोंधळ उडाला. या अपघातात ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा ९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला
या प्रकरणी शुक्रवारी (१३ डिसेंबर) 'पुष्पाभाऊ' म्हणजेच अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला कनिष्ठ न्यायालयात हजर केले, तेथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर अभिनेत्याने आपल्या वकिलाच्या मदतीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, कागदोपत्री उशीर झाल्यामुळे त्यांना एक रात्र तुरुंगात काढावी लागली आणि शनिवारी (१४ डिसेंबर) पहाटे त्याची सुटका झाली.
जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुनचे वक्तव्य
तेलुगू सुपरस्टारने एका निवेदनात म्हटले होते की, चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या परिवाराला आणि तिच्या मुलाला माझ्या लीगल टीमने भेटण्यास मनाई केली होती. या दुर्दैवी घटनेनंतर सतत वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या तरुण श्रीमान तेजबद्दल मला खूप काळजी वाटत असल्याचे अल्लू अर्जुनने म्हटले होते. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे मला त्यांला आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास मिळाले नाही. माझ्या प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहेत. त्याच्या वैद्यकीय आणि कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी मी नक्कीच घेईन. मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लवकरात लवकर भेटेन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.