Pushpa 2 Stampede : अल्लू अर्जुनला समन्स बजावल्यानंतर आज चौकशीला सुरुवात !

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, अभिनेत्याचा त्रास काही संपताना दिसत नाही. ४ डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी आज आलू अर्जुन चौकशीसाठी हजार झाला आहे.
Pushpa 2
Pushpa 2SAAM TV
Published On

Pushpa 2 Stampede : 'पुष्पाभाऊ' म्हणजेच साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढतच आहेत. ४ डिसेंबर रोजी 'पुष्पा 2' च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अभिनेत्याला आज म्हणजेच २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला आहे.

या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक केली आणि नंतर त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला. अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने त्याला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

Pushpa 2
Shaan : गायक शानच्या घराला मध्यरात्री लागली आग ; थोडक्यात बचावले संपूर्ण कुटुंब !

गेल्या रविवारी आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड केली. हे आंदोलक संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत होते. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे (OU-JAC) सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निदर्शकांनी तेलुगू सुपरस्टारच्या घरावर दगडफेक केली.

Pushpa 2
Anil Kapoor Birthday: दुबईत अपार्टमेंट अन् लग्जरी कार, 'मिस्टर इंडिया' किती कोटींचे मालक?

मुलांना घरापासून दूर ठेवले

या घटनेनंतर सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या मुलांना सुरक्षित स्थळी नेले. यासोबतच अभिनेत्याचे वडील अल्लू अरविंद यांनी कायद्यावर विश्वास व्यक्त केला तोडफोड करणाऱ्यांकडून चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलनात सहभागी असलेल्या सहा जणांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com