Allu Arjun Fees: फायर हूं मैं फायर! 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुनने घेतले बक्कळ मानधन; तेलुगू सिनेसृष्टीतील ठरला सर्वात महागडा अभिनेता

Allu Arjun's first look from 'Pushpa 2': 'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर.
Pushpa 2 First Poster
Pushpa 2 First PosterSaam TV
Published On

Allu Arjun and Rashmika Mandanna's Pushpa 2: 'पुष्पा द राइज'च्या यशानंतर आता प्रेक्षक 'पुष्पा २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा द रुल'चा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रेक्षक 'पुष्पा द रुल' पाहण्यासाठी अधिक आतुर झाले आहेत. पुष्पामधील संवाद आणि गाणी प्रेक्षकनाच्या आजही तोंडावर आहेत. म्हणून जेव्हा 'पुष्पा द रुल'चा टीझर रिलीज झाला तेव्हा तो चाहत्यांना खूप आवडला.

अल्पावधीतच पुष्प २च्या टीझरला भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी भरपूर मानधन घेतले असल्याचे सांगण्यात आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने किती पैसे घेतले आहेत.

अल्लू अर्जुनच्या पुष्पा प्रमाणे पुष्पा 2 देखील जबरदस्त चित्रपट असणार यात शंका नाही. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यास तुम्हाला याची कल्पना येईल. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी निर्मात्यांनी पुष्पा 2 चा टीझर प्रदर्शित केला होता.

Pushpa 2 First Poster
Shahid-Kriti Film First look: शाहिद कपूर-क्रिती सेनन पहिल्यांदाच दिसले एकत्र; दोघांचे रोमँटिक पोस्टर व्हायरल

चाहत्यांना टीझर खूप आवडला आहे. पुष्पा 2 देखील इतिहास रचू शकते. रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी जवळपास 85 लाख रुपये मानधन घेतले आहे.

याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, जर हे खरे असेल तर तेलुगू चित्रपटसृष्टीतील हा एक नवा विक्रम ठरेल. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल हे देखील दिसणार आहेत.

चित्रपटाच्या टीझरबद्दल बोलायचे झाले तर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुष्पा तुरुंगातून पळून गेल्याचे आणि पोलिसांच्या आठ गोळ्या लागल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये दिसत आहे की, प्रत्येकजण पुष्पाचा शोध घेत आहे, मात्र टीझरच्या शेवटी तो वाघासोबत दिसत आहे. टीझरच्या शेवटी अल्लू अर्जुन म्हणतो, आता राज्य पुष्पाचं.

या टीझरसोबत अल्लू अर्जुनचा एक लूकही समोर आला आहे, ज्यामध्ये तो पूर्णपणे निळ्या रंगात रंगलेला दिसत आहे. त्याने नाकात नथ, कानात कानातले आणि गळ्यात माळा आणि हार घातले आहेत. सिक्वेल सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुष्पाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com