
Akshay Kuma and Amitabh Bachchan: ठाणे, महाराष्ट्र येथे आयोजित केलेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामन्यात अनेक कलाकार उपस्थित होते. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, सुपरस्टार अक्षय कुमार आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक खास बनवला. या स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये अक्षय आणि अमिताभ बच्चन यांच्यातील एक खास नाते दिसून येते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांना पाहताच त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करु लागतो. नंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि बोलत पुढे जातात. या व्हिडीओला खूप प्रेम मिळत आहे. तसेच अक्षयचे खूप कौतुक होत आहे. अक्षय आणि बिग बी यांना 'वक्त' आणि 'एक रिश्ता' सारख्या चित्रपटांमध्ये वडील-मुलाच्या भूमिकेत पाहिले होते.
सचिन तेंडुलकर मुंबई संघाला पाठिंबा देत असलेल्या व्हीआयपी स्टँडवर अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना दिसले. दरम्यान, श्रीनगरच्या वीर टीमचा मालक अक्षय कुमार त्याची मुलगी नितारा भाटियासोबत उपस्थित होता . तो काळ्या रंगाच्या स्टायलिश स्ट्राइप्ड आउटफिटमध्ये दिसला आणि त्याच्या उपस्थितीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अक्षय कुमार लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूत बांगला' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि तब्बूसारखे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. याशिवाय खिलाडी कुमार 'हाऊसफुल ५' मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये दाखल होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.