Har Har Mahadev New Song Released: अक्षय कुमारने श्रावणात केला शिवतांडव; ‘OMG 2’मधील भगवान शंकरावरील नवं गाणं ऐकुन येईल शहारा

OMG 2 New Song: ‘OMG 2’ मधील ‘हर हर महादेव’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Har Har Mahadev New Song Released
Har Har Mahadev New Song ReleasedYou Tube
Published On

Har Har Mahadev New Song Released: अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘OMG2’ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. येत्या ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी चित्रपटातील ‘ऊंची ऊंची वादी’ (Oonchi Oonchi Waadi) हे गाणं आणि टीझर प्रेक्षकाच्या भेटीला आला होता. गाण्यासह टीझरला देखील प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नुकतंच चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्या गाण्याचं नाव ‘हर हर महादेव’ असं असून गाण्यामध्ये शिवशंकराच्या रुपात अक्षयचा तांडव दिसून येत आहे.

Har Har Mahadev New Song Released
Goregaon Film City: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, गोरेगाव फिल्म सिटीतील १५ दिवसांतील तिसरी घटना

दरम्यान प्रेक्षकांना चित्रपटातील गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गाण्याची उत्सुकता होती, ते गाणं अखेर आज सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्याला युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

‘हर हर महादेव’ या गाण्यात अक्षय एका ट्रकमध्ये सिंहासनावर बसलेला दिसत आहे. त्याच्यासमोर अनेक अनेक जटाधारी साधु नाचताना दिसत आहेत. अचानक अक्षय ट्रकमधुन खाली उडी मारतो. तो भगवान शंकराच्या रुपात तांडव करताना दिसतो.

अक्षयचं हे रुप चाहत्यांना फारंच भावलं असून गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होच आहे. (Song)

‘हर हर महादेव’ हे गाणे शेखर अस्तित्व यांनी लिहिलं आहे, तर विक्रम मॉन्ट्रोजने गाण्याला आवाज दिला असून हे गाणं संगीतबद्ध केले आहे.‘ओएमजी २’ला सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्यापूर्वी हा चित्रपट रिव्हाईजिंग कमिटीकडे पाठवला होता. त्या कमिटीने अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटात तब्बल २० कट्स सुचवले आहेत. आणि बोर्डाने चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्याची सूचना निर्मात्यांना दिली आहे.

Har Har Mahadev New Song Released
KGF 2 Craze In Japan : भारताप्रमाणे जपानमध्येही ‘KGF 2’ ची क्रेझ कायम, ‘सलाम रॉकी भाई’च्या घोषणेने थिएटर दणाणले

सेन्सॉर बोर्डाप्रमाणेच सेन्सॉरच्या रिव्हाईजिंग कमिटीनेही चित्रपटाला नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाने दिलेले सर्व बदल झाल्यानंतरच चित्रपटाला सर्टिफिकेट दिले जाऊ शकते. परंतु चित्रपट निर्मात्यांना CBFC ने सुचवलेले बदल आणि रिव्हाईजिंग कमिटीचे चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देण्याबाबत बोलणं चित्रपटाच्या निर्मात्यांना पटलेलं नाही. या संदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे मांडायचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com