Akanksha Dubey CBI Enquiry: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह वाराणसीतील हॉटेलच्या खोलीत आढळला होता. तिच्या आत्महत्येचा बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. तिच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले होते, ज्याची उत्तरे अद्याप सापडलेली नाहीत. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. पण अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
आकांक्षाच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आकांक्षा दुबे प्रकरणात काही नवीन अपडेट समोर आले आहेत.
अभिनेत्रीच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली असून या अहवालात अनेक खुलासे झाले आहेत, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी अधिक वेगाने सुरू झाली आहे. (Latest Entertainment News)
आकांक्षाच्या अंडरगारमेंटवर स्पर्म्स सापडले आहेत. हा धक्कादायक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी समर सिंह आणि संजय सिंह यांच्यासह आणखी चार जणांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे डीएनए चाचणीची परवानगी मागितली आहे.
आकांक्षा दुबे प्रकरणातील आरोपी समर सिंग, संजय सिंग, संदीप सिंग आणि अरुण पांडे यांचे डीएनए नमुने पोलीस घेणार असून पुढील तपास करणार आहेत. अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर सिंग आणि संजय सिंग तुरुंगात आहेत. आकांक्षा शेवटची संदीप सिंगसोबत दिसली होती. आत्महत्येपूर्वी अभिनेत्री एका पार्टीतून हॉटेलवर परतली होती.
एएनआयशी बोलताना वकील शशांक शेखर त्रिपाठी म्हणाले होते, 'मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहे. आकांक्षा यांच्या कुटुंबीयांनी वाराणसी पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
आकांक्षाच्या आईच्या म्हणण्यानुसार, गायक समर सिंह आकांक्षाला त्रास देत असे. आकांक्षाच्या कुटुंबीयांचा असा विश्वास आहे की त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे.
समर सिंह हा आकांक्षा दुबेच्या कथित आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहे. वाराणसी पोलीस आणि गाझियाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला अटक केली.
25 वर्षीय अभिनेत्री आकांक्षा दुबे 26 मार्च रोजी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. तिने 'कसम पैदा करने वाले की 2', 'मुझसे शादी करोगी' आणि 'वीरों'सह अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.