FIR On Actor: गँगस्टरवरील एका पोस्टमुळे अभिनेता अडचणीत, क्राइम ब्राँचमध्ये गुन्हा दाखल

FIR On Bigg Boss Fame Actor: अभिनेता एजाज खानने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि गँगस्टर सलमान लालाचा विषयी वक्यव्य केले. या विधानानंतर इंदूर पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
FIR On Ajaz Khan
FIR On Ajaz Khan SAAM TV
Published On

FIR On Bigg Boss Fame Actor: इंदूरमधील गुंड सलमान लालाच्या मृत्यूबद्दलचा वादग्रस्त व्हिडिओ शेअर केल्याबद्दल अभिनेता एजाज खाननेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्याने मध्य प्रदेश पोलिसांची माफी मागितली आहे. गुरुवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एजाज खानने दावा केला की लाला हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे असा समज त्याचा झाला. तो म्हणाला की नंतर मला मध्य प्रदेश पोलिस आणि इतरांकडून कळले की तो एक वॉन्टेड गुन्हेगार आहे ज्याचा बुडून मृत्यू झाला.

'बिग बॉस ७' मध्ये दिसलेला अभिनेता एजाज खानने सांगितले की सत्य कळताच त्याने लगेचच "चुकीचा व्हिडिओ" काढून टाकला. एजाज खान म्हणाला, "मी या व्हिडिओसाठी पोलिसांची माफी मागतो. मी संविधानावर दृढ विश्वास ठेवतो आणि तपासात पूर्ण सहकार्य करेन. गुन्हेगाराचा कोणताही धर्म नसतो. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो."

FIR On Ajaz Khan
Kapil Sharma Warning:कपिल शर्माला मनसेचा गंभीर इशारा, मुंबईचा अपमान केल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण

अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी इर्शाद हकीम यांनी ९ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एजाज खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिकाऱ्याने सांगितले की, एजाज खानने त्यांच्या इंस्टाग्राम 'स्टोरी' फीचरद्वारे सलमान लालाच्या मृत्यूबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला होता, या व्हिडिओमध्ये धार्मिक गैरसमज पसरवण्याच येत होते.

FIR On Ajaz Khan
Karishma Sharma: धावत्या लोकलमधून उडी मारणारी अभिनेत्री कोण? का उचलले असं पाऊल, वाचा सविस्तर

पोलिसांनी सांगितले की त्यांनी गेल्या महिन्यात सिहोर बायपास रोडवरील ड्रग्ज प्रकरणात चार जणांना अटक केली होती, तर सलमान लाला पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर त्याचा मृतदेह तलावातून सापडला. सलमान लालाच्या नातेवाईकांनी आरोप केला की तो एक अनुभवी पोहणारा होता आणि त्याला समुद्रात पोहता येत होतं.

एडीसीपी दंडोतिया यांनी आरोप निराधार असल्याचे सांगितले आणि म्हणाले, प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालावरून असे दिसून आले की सलमान लालचा मृत्यू पाण्यात बुडून झाला. पोलिसांच्या नोंदीनुसार, सलमान लालाविरुद्ध ३२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com