Raid 2 Box Office Collection: 'रेड 2' ने गाजवलं बॉक्स ऑफिस; दुसऱ्या सोमवारी केली इतक्या कोटींची कमाई

Raid 2 Box Office Collection Day 12: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवत आहे.
Raid 2 Box Office Collection
Raid 2 Box Office Collectioninstagram
Published On

Raid 2 Box Office Collection Day 12: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवत आहे. केवळ 12 दिवसांतच या चित्रपटाने 125.75 कोटींची कमाई केली आहे, त्यामुळे हा चित्रपट 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे . या यशामुळे अजय देवगनने सलमान खानच्या 'सिकंदर' आणि अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकले आहे .

'रेड 2' मध्ये अजय देवगनसोबत रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाने पहिल्या चार दिवसांतच 70.75 कोटींची कमाई केली होती . दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई स्थिर राहिली असून, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी एकूण कमाई 120.75 कोटींवर पोहोचली आहे .

Raid 2 Box Office Collection
Rapper Tory Lanez: भयंकर! प्रसिद्ध रॅपरवर तुरुंगात जीवघेणा हल्ला; छाती आणि पाठीवर १४ वार

या यशामुळे अजय देवगनने लॉकडाउननंतरच्या काळात बॉलिवूडमध्ये आपली स्थान दाखवून दिल आहे. त्यांने 'सिंघम अगेन' आणि 'रेड 2' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, 'रेड 2' ने सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांच्या तुलनेत अधिक कमाई केली आहे .

Raid 2 Box Office Collection
Miss World 2025: मिस वर्ल्ड २०२५चे स्पर्धक आले भारतात; बुद्धपौर्णिमेनिमित्त घेतली बुद्धवनची भेट

'रेड 2' च्या यशामुळे बॉलिवूडमध्ये सिक्वेल्स आणि फ्रँचायझी चित्रपटांच्या यशस्वीतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. अजय देवगनच्या आगामी चित्रपटांमध्ये 'दे दे प्यार दे 2', 'दृश्यम 3' आणि 'गोलमाल 5' यांचा समावेश आहे, ज्यामुळे त्याच्या स्टारडम आणखी वाढण्याची शक्यता आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com