‘Natu- Natu ला माझ्यामुळे ऑस्कर...’ अजय देवगणचं The Kapil Sharma Show मध्ये खळबळजनक वक्तव्य

‘भोला’ स्टारर अजयने ऑस्कर विजेत्या ‘नाटू-नाटू’ या गाण्यावर एक वक्तव्य केल्यामुळे बराच चर्चेत आला आहे.
The Kapil Sharma Show On Ajay Devgan
The Kapil Sharma Show On Ajay DevganSaam Tv

The Kapil Sharma Show On Ajay Devgan: एस एस राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने ‘नाटू-नाटू’ या गाण्यासाठी ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मुळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. जगभरात सध्या ‘RRR’ या भारतीय चित्रपटाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘सिंघम’ या चित्रपटानेही आपला जलवा दाखवला होता. त्याचवेळी, आता ‘भोला’ स्टारर अजयने ऑस्कर विजेत्या ‘नाटू-नाटू’ या गाण्यावर एक वक्तव्य केल्यामुळे बराच चर्चेत आला आहे. त्याच्यामुळेच गाण्याला हा मान मिळाला असल्याचे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

The Kapil Sharma Show On Ajay Devgan
Asha Bhosale: ‘हा पुरस्कार महाराष्ट्राचा... ’; आशाताई ‘महाराष्ट्र भूषण’ स्विकारताना गहिवरल्या

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये अजय ‘भोला’ चित्रपटातील त्याची को-स्टार तब्बूसोबत ग्रँड एन्ट्री घेताना दिसत आहे. यादरम्यान कपिलने या दोघांसोबत खूपच धमाल मस्ती केली. कार्यक्रमात कॉमेडीयनसोबत अजयचे आणि तब्बूचे संभाषण खूपच मजेदार आहे. नंतर कपिलने अजय देवगणचे ‘नाटू-नाटू’ गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. हे ऐकून अजय असे काही बोलतो की सगळेच तात्पुरते अवाक होतात.

अजय देवगण म्हणतो, ‘‘नाटू-नाटू’ या गाण्याला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला आहे. कल्पना करा की, त्यात मी नाचलो असतो तर?’ अशाप्रकारे अजय त्याच्या डान्सची त्या कार्यक्रमात कौतुक करत होता. कपिलच्या कार्यक्रमातील अजयचे हे वक्तव्य ऐकून सर्वांनाच हसू आवरत नाही. या प्रोमोवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा सिलसिला सुरू केला आहे. अजयच्या सेन्स ऑफ ह्युमरवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘जेव्हाही अजय सर कपिल शर्मा शोमध्ये येतात तेव्हा ते खूपच बोलतात.’ दुसर्‍याने लिहिले, ‘तब्बू आणि अजयचा हा एपिसोड पाहण्याची मला खूपच उत्सुकता आहे.’

The Kapil Sharma Show On Ajay Devgan
Nilu Kohli: अभिनेत्री निलू कोहलीवर कोसळला दुःखाचा डोंगर

‘भोला’ चित्रपटात अजय देवगण आणि तब्बूशिवाय अजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव सारखे स्टार्सही आहेत. आगाऊ तिकीट बुकिंगमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हे पाहून ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यात अभिनयासोबतच अजयने दिग्दर्शनही केले आहे. ‘भोला’ ३० मार्चला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com