Upcoming South Movie: साऊथची हाऊसफुल्ल मेजवानी..! 'आदिपुरुष' ते 'पुष्पा 2'... हे साऊथ सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर

South Star's Movie List : प्रभासच्या 'आदिपुरुष'पासून ते अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'पर्यंत मोस्ट अवेटेड चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत.
Upcoming South Movie
Upcoming South Movie
Published On

Upcoming South Movie In 2023 : भारतात सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका आहे. बाहुबली, केजीएफ, पुष्पा, आरआरआर या चित्रपटांमुळे दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. या चित्रपटानंतर प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.

दाक्षिणात्य चित्रपटांची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी २०२३ हे वर्ष खूप खास असणार आहे. प्रभासच्या 'आदिपुरुष'पासून ते अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' पर्यंत, मोस्ट अवेटेड चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. (Latest Entertainment News)

Upcoming South Movie
HBD Paresh Rawal : बँकेत नोकरी करणाऱ्या बाबू भैय्याला मिळाली मिस इंडिया, कॉमेडी किंग परेश रावल यांचा जीवनप्रवास

'आदिपुरुष'

चित्रपटप्रेमी सध्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रेमात आहेत. तसेच चित्रपटाची चातकासारखी वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. आदिपुरुष चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

'लिओ'

साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयही यावर्षी धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. अभिनेत्याचा मोस्ट अवेटेड चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. थलपथीचा हा आगामी चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

'सालार'

'आदिपुरुष'नंतर या चित्रपटाचा दबदबा निर्माण करण्यासाठी प्रभास तयारी करत आहे. या चित्रपटात प्रभास अगदी वेगळ्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

'पुष्पा २'

या सर्व चित्रपटांव्यतिरिक्त अल्लू अर्जुन देखील या मोस्ट अवेटेड चित्रपटासह सज्ज आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरला चित्रपटप्रेमींना खूप आवडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com