Paresh Rawal Career: जेष्ठ अभिनेते परेश रावल यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. परेश रावल यांनी कष्टाने आणि समर्पणाने इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते परेश रावला यांचा आज ३० मे रोजी वाढदिवस आहे. गंभीर व्यक्तिरेखा असो की विनोदी परेश रावल यांनी प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे केली आहे.
परेश रावल यांच्या 'हेरा फेरी' या कॉमेडी चित्रपटातील बाबू भैय्या ही भूमिका कोणीच कधीही विसरू शकत नाही. या कॉमेडी चित्रपटामध्ये परेश रावल यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अभिनयाच्या दुनियेत स्वतः ला सिद्ध करणाऱ्या परेश रावल यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. चित्रपटात येण्यापूर्वी परेश रावल बँकेत नोकरी करत होते. (Latest Entertainment News)
चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी अभिनेते बँक ऑफ बडोदामध्ये काम करत होते. मात्र, परेश त्यांच्या नोकरीवर खूश नव्हते, अखेर त्यांनी नोकरी सोडली आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावले.
1995 मध्ये अर्जुन या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात परेश खलनायकाच्या भूमिकेत दिसले. यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत सुमारे 270 चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.
परेश रावल केवळ चित्रपटांमध्येच सक्रिय आहेत असे नाही. अभिनेते सामाजिक प्रश्नांवरही त्यांचे मत व्यक्त करत असतात. परेश रावल त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार कमी बोलतात.
परेश रावल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्यांनी मिस इंडिया स्वरूप संपतशी लग्न केले आहे. 1975 मध्ये त्यांनी स्वरूप यांना प्रपोज केले. 12 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1987 मध्ये लग्न केले. परेश रावल बॉलीवूड व्यतिरिक्त गुजराती सिनेविश्वात देखील काम करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.