Sonali Kulkarni: माझा इतर महिलांना दुखवण्याचा हेतू नव्हता... व्हायरल व्हिडिओनंतर सोनालीने माफी मागितली

Sonali Kulkarni Apologises: सोनाली तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेटकऱ्यांचा रोष सहन करावा लागला आहे.
Sonali Kulkarni Apologises
Sonali Kulkarni ApologisesInstagram @sonalikul

Sonali Kulkarni's comments on 'lazy' women:अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासह सामाजिक क्षेत्रात देखील सक्रिय आहे. सोनाली अनेक सामाजिक मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करत असते. ती तिचे विचार मांडते. यावेळी मात्र सोनाली तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेटकऱ्यांचा रोष सहन करावा लागला आहे.

स्त्री-पुरुष समानतेवर आधारित एक कार्यक्रमात सोनालीने काही गोष्टी सांगितल्या होत्या. या कार्यक्रमात सोनाली म्हणाली होती की, 'भारतीय स्त्रिया आळशी झाल्या आहेत, त्यांना चांगला कमावणार नवरा किंवा बॉयफ्रेंड हवा आहे. पण स्वतः ला काय करायचे हे माहीत नाही.' सोनाली हा व्हिडिओ सोशल मीडिया होताच नेटकऱ्यांनी तिच्या या बोलण्याचे विविध अर्थ काढत तिच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली.

Sonali Kulkarni Apologises
Urfi Javed: स्त्रियांना फक्त मुलांना जन्म देणार यंत्र... भारतीय महिलांना आळशी म्हणणार्‍या सोनालीवर उर्फीची घणाघाती टीका

सोनालीच्या या वक्तव्याचे काहींनी तिचे कौतुक केले आणि काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. उर्फी जावेदने देखील काळ ट्विट करत सोनालीवर राग व्यक्त केला होता. सोनालीचा हा व्हिडिओ एक अज्ञात व्यक्तीकडून शेअर करण्यात आला होता. सोनालीने आता या प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक शेअर करत मौन सोडले आहे.

सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मला मिळत असलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांचे मी तुम्हा सर्वांचे, विशेषत: संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी खूप समंजसपपणे आणि भान राखून हे सर्व हाताळले आहे.

मी स्वतः एक स्त्री आहे त्यामुळे माझा इतर महिलांना दुखवण्याचा हेतू नव्हता. खरं तर, आपल्या समर्थनार्थ एक स्त्री असणं म्हणजे काय ते मी वेळोवेळी व्यक्त केलं आहे. वैयक्तिकरित्या कौतुक करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे आशा आहे की आपण विचारांची अधिक मुक्त देवाणघेवाण करू शकू.

माझ्यापरिने मी केवळ महिलांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीशी विचार, पाठिंबा आणि प्रेम देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण स्त्रिया सर्वसमावेशक आणि एकमेकांप्रती सहानुभूतीपूर्ण असू तरच आपण विचारांनी सशक्त आणि आनंदी समाज निर्माण करू शकू.

माझ्या वक्त्यव्यामुळे जर नकळत कोणाला वेदना झाल्या असतील, तर मी मनापासून माफी मागू इच्छितो. मी ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन्स भाग व्हायचे नाही. मी एक खूप आशावादी आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की जीवन खरोखर सुंदर आहे. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com