अभिनेत्री रसिका सुनील अडकली लग्नबंधनात; वेडिंग फोटोज झाले व्हायरल

रसिकाने आपल्या बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्न गाठ बांधली आहे.
अभिनेत्री रसिका सुनील अडकली लग्नबंधनात; वेडिंग फोटोज झाले व्हायरल
अभिनेत्री रसिका सुनील अडकली लग्नबंधनात; वेडिंग फोटोज झाले व्हायरलInstagram/@adi_bilagi
Published On: 

गोआ: छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेली मराठी मालिका म्हणजेच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील शनायाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे रसिका सुनीलचे तर विदेशातही लाखो चाहते आहेत. याच शनायाचे लग्न झाले आहे. शयाना म्हणजे खरीखुरी रसिका. होय... रसिकाने आपल्या बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्न गाठ बांधली आहे. रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये Relationship होते. रसिकाने आणि आदित्यने नुकतच त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून Rasika Sunil Instagram Account हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शन मध्ये लिहिल्यानुसार, या दोघांनी गोव्यात लग्न केले आहे. ते दोघे सप्तपदी चे फेरे घेत असताना हा फोटो शेअर करत ‘18 ऑक्टोबर 2021, बीचवर रस्की-आदिचं लग्न’, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. त्या दोघांनी 18 ऑक्टोबर रोजी लग्न उरकले आणि आज 30 ऑक्टोबर रोजी फोटो सोशल मीडिया इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्या फोटो वर कमेंट करत त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नात फक्त जवळचे लोक होते.

रसिका 2 वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडून होती. त्यानंतर रसिका लॉस एंजिलिसला Los Angeles पुढील शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिथे तिची ओळख आदित्यशी झाली होती. 1 जानेवारी रोजी ती तिच्या फॅन्सला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने तिच्या रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सर्वांना सांगितले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.