Priyanka Chopra: 'व्हर्जिन वाइफ' शोधू नका, 'कौमार्य' एका रात्रीतच...; प्रियंका चोप्राच्या वक्तव्याने खळबळ

Priyanka Chopra: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv
Published On

Priyanka Chopra: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत तिने म्हटले, “पत्नी बनवण्यासाठी वर्जिन मुलगी शोधू नका, तिच्या आचरणाकडे पाहा. वर्जिनिटी एक रात्रीत संपते, पण आचरण कायमचं राहतं.” या विधानामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

प्रियंकाच्या या विधानावर अनेकांनी तिचे समर्थन केले, तर काहींनी तीव्र टीका केली. एका युजरने प्रत्युत्तर दिले, “मग तुम्हीही पुरुषाच्या उत्पन्नाकडे पाहू नका, त्याच्या आचरणाकडे पाहा. पैसा एक दिवस संपतो, पण आचरण कायम राहतं.” या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर लिंगभेद आणि समाजातील रूढीवादी विचारसरणीवर चर्चा सुरू झाली आहे.

Priyanka Chopra
Sonali Bendre: सलमान खानला पसंत करणं कठीण; सोनाली बेंद्रेने अनेक वर्षांनंतर केली अभिनेत्याची पोलखोल

प्रियंका चोप्रा नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी आणि स्त्री पुरुष समानतेसाठी आवाज उठवत आली आहे. तिच्या या विधानामागेही महिलांच्या सामाजिक स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याचा उद्देश असल्याचे काहींनी म्हटले आहे. तिच्या या विधानामुळे समाजातील जुने विचार आणि नवीन पिढीतील बदल यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

Priyanka Chopra
Actor wins Mhada Lottery: 'एका Artist चं घर...'; या अभिनेत्याला लागली म्हाडा लॉटरी; फॅमिलीसोबत थाटाट केला गृहप्रवेश

या वादानंतर प्रियंका चोप्राने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, तिच्या या विधानामुळे समाजातील लैंगिक समानतेबद्दलची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. या चर्चेमुळे समाजातील रूढीवादी विचारसरणीला आव्हान देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com