Khushi Mukherjee: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी २५ लाखांची चोरी; घरातीलच व्यक्तीवर संशयाची सूई, पण कुणावर?

Khushi Mukherjee: ग्लॅमरस स्टाईलसाठी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या घरातून २५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. खुशीने तिच्या घरातील नोकरावर चोरीचा संशय व्यक्त केला आहे.
Khushi Mukherjee
Khushi MukherjeeSaam Tv
Published On

Khushi Mukherjee: टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो स्प्लिट्झव्हिलाची स्पर्धक आणि अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर खुशीचे चांगले चाहते आहेत आणि ती अनेकदा तिच्या आयुष्यातील अपडेट्स आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते. सध्या खुशी तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्रीच्या घरी मोठी चोरी झाली आहे. खुशीने तिच्या घरातील मोलकरणीवर तिच्या घरातून २५ लाखांचे दागिने चोरीचा आरोप केला आहे. खुशीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि तिच्या तक्रारीत तिने तिच्या मोलकरणीवर संशय व्यक्त केला आहे.

Khushi Mukherjee
'मला वाईटरित्या स्पर्श केला अन्...; शूटींग दरम्यान सलमान खानच्या अभिनेत्रीची काढली छेड

घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर चोरीचा संशय

माध्यमांशी बोलताना खुशीने या घटनेबद्दल खुशीने सांगितले, तुमच्यासाठी एखादी खास व्यक्ती, ज्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता, ती तुमच्याशी अशा प्रकारे विश्वासघात करू शकते हे खूप दुःखद आहे. माझ्या घरातील चोरीच्या घटनेपासून माझी मोलकरीण बेपत्ता आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. खुशी म्हणते की तिला स्वप्नातही वाटले नव्हते की तिची घरकाम करणारी महिला असे काही करू शकते. या घटनेने ती खूप हादरली आहे.

Khushi Mukherjee
Arjun Bijlani: लग्नाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला घटस्फोट? स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

घटनेनंतर मोलकरीण बेपत्ता आहे

पोलिसांनी आरोपी मोलकरीणचा शोध सुरू केला आहे. आरोपी घटनेपासून बेपत्ता आहे आणि पोलिसांनी मोलकरणीला शोधण्यासाठी एक पथक नियुक्त केली आहेत. खुशी मुखर्जीबद्दल बोलायचे झाले तर, खुशी ही साऊथमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक वेब सिरीज, रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. २८ वर्षीय अभिनेत्रीने २०१३ मध्ये अंजाल या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले. तिने हिंदी चित्रपट शृंगारमध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com