Anushka Sharma Top 5 Movies IMDB Rating: अनुष्काचे 'हे' आहेत टॉप रेटिंग चित्रपट, एक नंबरला तर तोडच नाही...

आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' या रोमॅंटिक चित्रपटातून अनुष्का शर्माने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले.
Anushka Sharma IMDB Rating Top 5 Movies
Anushka Sharma IMDB Rating Top 5 Movies Saam Tv

Anushka Sharma Birthday Special : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा नाव आज आघाडीत आहे. अनुष्काने तिच्या बिग बजेट चित्रपटातून अल्पावधीतच नाव कमावलं आहे. लहान वयातच केवळ सौंदर्याने प्रसिद्धीझोतात आलेल्या अनुष्काने मॉडेलिंगतून तिच्या करिअरची सुरूवात केली अनुष्काने तिच्या अभिनयानं सिनेमाविश्वात स्वत:च पक्क स्थान केलं आहे.

Anushka Sharma IMDB Rating Top 5 Movies
CM Eknath Shinde announced Makarand Anaspure As Ambassador: मकरंद अनासपुरे एसटीचे नवे सदिच्छा राजदूत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अनुष्का शर्मा आज प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर ती निर्माती सुद्धा आहे.शाहरूख, रणवीर अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर अनुष्काने काम केले. उत्तम स्क्रिफ्टवर काम करत सुपरहिट चित्रपटांवर अनुष्काने तिचं नाव कोरले आहे. यशराज बॅनर्सच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून अनुष्काने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने कधी मागे वळूनच पाहिलंच नाही.

Anushka Sharma IMDB Rating Top 5 Movies
Ketaki Chitale Instagram Story: केतकी चितळे सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुन्हा ट्रोल, महाराष्ट्रदिनी विचारलेले ५ प्रश्न

पंधरा वर्षांपूर्वी, आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' या रोमॅंटिक चित्रपटातून अनुष्का शर्माने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले. चित्रपटात अनुष्का अभिनेता शाहरूखसोबत अभिनय करताना दिसली. यानंतर अनेक चित्रपटात काम करत अनुष्काने स्वताच वेगळं स्थान निर्माण केले आहे.

अनुष्का शर्मा निर्मित एनएच 10,फिल्लोरी, परी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. भावासोबत क्लीन स्लेट फिल्म्स कंपनीची स्थापना केल्यानंतर अनुष्काने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. आता ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री सज्ज झाली आहे. अनुष्काच्या वाढदिवसांबद्दल तिच्या टॉप चित्रपटांची माहिती घेऊया...

Anushka Sharma Top 5 Movies IMDB Rating
Anushka Sharma Top 5 Movies IMDB RatingSaam Tv

आयएमडीबीने सर्वाधिक रेटिंग दिलेले अनुष्का शर्माचे 'टॉप 5' चित्रपट

1. पीके : अनुष्का शर्माच्या 'पीके' या चित्रपटाला ८.१ रेटिंग मिळाली आहे. २०१४ साली राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

2. रब ने बना दी जोडी : २००८ मध्ये दिग्दर्शित झालेला 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.चित्रपटात अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसले होते. 'रब ने बना दी जोडी' हा सिनेमा आयएमडीबी रेटिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या सिनेमाला ७.२ रेटिंग मिळाली आहे.

3. बँड बाजा बारात : मनीष शर्मा दिग्दर्शित बँड चित्रपट २०१० साली रिलीज झाला. चित्रपटात रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. 'बॅंड बाजा बारात' या चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगमध्ये ७.२ रेटिंग मिळाले आहे.

4. दिल धडकने दो : अनुष्का शर्माच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत 'दिल धडकने दो' या चित्रपटाचा समावेश आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धिंगाणा केला. चित्रपटात अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियंका चोप्रा, रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. 'बॅंड बाजा बारात' या चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगमध्ये ७.२ रेटिंग मिळाले आहे.

5. सुई धागा मेड इन इंडिया : अनुष्काच्या 'सुई धागा : मेड इन इंडिया' या चित्रपटात आयएमडीबी रेटिंगमध्ये ६.८ रेटिंग मिळाले आहे. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com