Navara Maza Navsacha 2: अशोक सराफ- सचिन पिळगावकरांचा सुपरहिट चित्रपट 'नवरा माझा नवसाचा' पार्ट 2 येणार
Navara Maza Navsacha Part 2:
मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा २००४ साली प्रदर्शित झालेला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. आजही या चित्रपटाला चांगली पसंती मिळते. या चित्रपटातील कलाकार, गाणी आणि संवाद सर्वकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडले. हा चित्रपट एकदा नाही तर अनेकदा अनेकांनी पाहिला.
आता या चित्रपटाबाबत एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा पार्ट २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी ही घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पार्ट २ येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सचिन पिळगावकर यांनी २००४ मध्ये 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'नवरा माझा नवसाचा २' (Navara Maza Navsacha 2) असं असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला उद्यापासून म्हणजे ५ फेब्रुवारीपासू सुरूवात होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर हेच करणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाबाबतची पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियाद्वारे केला आहे. त्यांनी 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाच्या क्लॅपचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नवरा माझा नवसाचा २….चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून सुरू होतं आहे. तुमचे आशीर्वाद पाठिशी राहू द्या.'
जयवंत वाडकर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट्समध्ये लिहिले की, 'काय म्हणता, खूप आनंदाची बातमी काका, खूप उत्साही आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'या चित्रपटात अशोक मामा पाहिजे.' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'पण अशोक सराफ पाहिजे साहेब त्याच्या शिवाय चालणार नाही.' चौथ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'माझा सर्वात आवडता चित्रपट. वाट बघत आहे.' तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, '२००४ ते २०२४, २० वर्षांपासून याची वाट पाहात आहोत.'
‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता चित्रपटाच्या पार्ट २ मध्ये कोण-कोण कलाकार असणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.