Prabhas Decision: प्रभासच्या एका निर्णयाने निर्मात्यांचे कोट्यवधी रूपये वाचले, काय होती प्रभासची आयडिया?

Prabhas Saved Makers Of Adipurush Refusing Idea: केवळ प्रभासच्या एका निर्णयामुळे आज ‘आदिपुरुष’ दिलासादायक कमाई करू शकला असं म्हंटलं जात आहे.
Prabhas's Strong Decision Saved From Being Humiliated
Prabhas's Strong Decision Saved From Being HumiliatedSaam Tv
Published On: 

Prabhas's Strong Decision Saved From Being Humiliated: ‘आदिपुरूष’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरला आहे. १६ जून रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रदर्शित होताच काही दिवसातच कमाईच्या बाबतीत मागे पडला. व्हिफएक्स, कलाकारांचा लूक, चित्रपटाची कथा आणि संवाद यामुळे हा चित्रपट बराच बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण सध्या प्रभासाच्या एका निर्णायामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला, अशी चर्चा सुरू आहे.

Prabhas's Strong Decision Saved From Being Humiliated
Arjun Kapoor Birthday: फ्लॉप चित्रपट देऊनही अर्जून करतोय करोडोंची कमाई, आहे इतक्या कोटींचा मालक

प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी दिलासादायक कमाई केलेली नाही. आठव्या आणि नवव्या दिवशीतर चित्रपटाने फारच कमी कमाई केली होती. चित्रपटाने जर बॉक्स ऑफिसवर अशीच कमाई कायम ठेवली तर लवकरच चित्रपटाला आपला गाशा गुंडाळावा लागेल, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक ओम राऊत हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणणार होते. चित्रपटाची लांबी फारच मोठी असल्यामुळे दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.

‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी प्रभासच्या समोर चित्रपटाची लांबी फारच मोठी असल्याने दोन भाग करण्याचा निर्णय सांगितला होता. पण केवळ प्रभासच्या एका निर्णयामुळे आज ‘आदिपुरुष’ दिलासादायक कमाई करू शकला असं म्हंटलं जात आहे. त्याने निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या त्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्याचा हा विरोध चित्रपटाला काही प्रमाणात तरी का होईना यशाच्या शिखरावर नेले.

Prabhas's Strong Decision Saved From Being Humiliated
Avdhoot Gupte News : करिना कपूरमुळे नापास झाला होता अवधूत गुप्ते; कॉलेजमधील किस्सा अनेकांना माहित नसेल

ज्या प्रमाणे ‘बाहुबली’च्या बाबतीत केलं तसंच ‘आदिपुरुष’च्या ही बाबतीत होईल की नाही याबाबत शंका होती. त्यामुळे प्रभासने त्या अगोदरच स्पष्टपणे सांगितलं आणि ओम राऊतलाही हा चित्रपट एकाच भागात पूर्ण करण्यासाठी तयार केलं. काही ट्रेड एक्स्पर्टने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासचा हा निर्णय चित्रपटाच्या सक्सेस बाबतीत फारच महत्त्वाचा ठरला.

Prabhas's Strong Decision Saved From Being Humiliated
Ram Charan Wife Upasana Emotional Video : लेकीच्या जन्माआधी उपासना Emotional; मैत्रिणीने शेअर केला भावुक व्हिडिओ

जर सर्वांनीच चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी होकार दर्शवला असता तर चित्रपटाच्या निर्मितीसाठी खर्च देखील वाढला असता. २०० ते ३०० कोटींचा निर्मात्यांना आणखी खर्च करावा लागला असता. चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ६०० कोटींचा खर्च लागला होता. सध्याचा चित्रपटाची कमाई पाहता चित्रपटाच्या असलेल्या बजेटच्या निम्मे पैसेही वसूल करता आलेले नाहीत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींपर्यंत आपली कमाई करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.