Arjun Kapoor Birthday: फ्लॉप चित्रपट देऊनही अर्जून करतोय करोडोंची कमाई, आहे इतक्या कोटींचा मालक

Arjun Kapoor Net Worth: सतत फ्लॉप चित्रपट देऊनही अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Arjun Kapoor Net Worth
Arjun Kapoor Net Worth Instagram

Arjun Kapoor Fees: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा ३८ वा वाढदिवस. २६ जून १९८५ रोजी अर्जूनचा जन्म झाला होता. २०१२ मध्ये इशकजादे चित्रपटातून अर्जूनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. इशकजादे नंतर गुंडे आणि 2 स्टेट्स हे त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक हिट चित्रपट ठरले. नमस्ते इंग्लंड, एक व्हिलन रिटर्न, हाफ गर्लफ्रेंड, तेवर आणि इंडियाज मोस्ट वाँटेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून देखील त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

Arjun Kapoor Net Worth
Avdhoot Gupte News : करिना कपूरमुळे नापास झाला होता अवधूत गुप्ते; कॉलेजमधील किस्सा अनेकांना माहित नसेल

आपल्या फिल्मी करिअरमध्ये सतत फ्लॉप चित्रपट देऊनही अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. सोबतच आज त्याच्या वाढदिवशी आपण त्याचं नेट वर्थ, सोबतच त्याचं लक्झरी लाईफबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अर्जुन प्रसिद्ध चित्रपट निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. त्याने आपलं शिक्षण ११ वीमध्ये नापास झाल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण केले. सोबतच त्याचं आणि मलायकामध्ये असलेले नातेसंबंध देखील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. अनेकदा त्यांच्या लग्नाची देखील चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूरची एकूण संपत्ती ८५ कोटी रुपये इतकी आहे. अर्जुन कपूर जाहिराती किंवा ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे १ कोटी रुपये आणि एका चित्रपटासाठी 6 ते 8 कोटी रुपये इतकं तो मानधन आकारतो.

Arjun Kapoor Net Worth
Ram Charan Wife Upasana Emotional Video : लेकीच्या जन्माआधी उपासना Emotional; मैत्रिणीने शेअर केला भावुक व्हिडिओ

इतकंच नाही तर, अर्जुन कपूर देखील लग्झरी लाइफस्टाइल जगतो. तो फेस वॉशपासून परफ्यूमपर्यंत सर्वच गोष्टी ब्रँडेड वापरतो. त्याच्या लक्झरीयस कारमध्ये मर्सिडीज एमएल ३५०, ऑडी क्यू ५, होंडा सीआरव्ही या गाड्या आहेत. तर तो जुहूतील JVPD येथील रहेजा ऑर्किडमध्ये राहतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com