Chhatrapati Sambhaji Maharaj: अभिनेता कमाल खान पुन्हा बरळला, छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलं आक्षेपार्ह विधान

Kamal Khan Controversial Statement Chhatrapati Sambhaji Maharaj: विकिपीडियावरील संभाजी महाराजाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खाननं शेयर केलाय. यावरून वाद सुरू झालाय.
Chhatrapati Sambhaji Maharaj
Kamal Khan Controversial Statement Chhatrapati Sambhaji MaharajSaamtv
Published On

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होतेय, याशिवाय शंभू महाराज यांची भूमिका विक्की कौशल याने साकारलीय. त्याच्या अभिनयाची कौतुक होत आहे. याचदरम्यान अभिनेता कमाल खान याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलंय.

विकिपीडियावरील संभाजी महाराजाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खाननं शेयर केलाय. विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह आहे. हाच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खानने पोस्ट शेअर केलीय. आता कमाल खानवर सरकार कारवाई करणार का? असा प्रश्न केला जात आहे. 'छावा' या चित्रपटाला प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे, त्याच दरम्यान विकीपिडीयामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विकिपिडियाचा माहितीचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो. मात्र त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण केलंय. विकिपिडियावरील खोडसाळ माहितीमुळं जाणिवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय.

शंभू महाराजांविषयीचा खोडसाळ मजकूर हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. मजकूर न हटवल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विकिपीडियाने दिलेल्या माहितीचा स्रोत हे वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन आहेत. दरम्यान विकिपीडियावरील मजकूर केआरकेने आपल्या ट्विटमध्ये पोस्ट केलाय. त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

गुजरातमध्ये प्रेक्षक चित्रपटगृहाचा पडदा फाडला

'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आलीय. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आहे. तर महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. या चित्रपटात औरंगजेबच्या भूमिका अक्षय खन्नाने साकारलीय. 'छावा'ला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटात पाहिल्यानंतर अनेकांना भावना अनावर होत आहेत. गुजरातमध्ये 'छावा' चित्रपट पाहताना अशीच एक घटना घडली आहे. भरूच येथील आरके सिनेमागृहात 'छावा' चित्रपटात चालू असताना चक्क चित्रपटगृहाचा पडदा फाडलाय. ही घटना रविवारी रात्री घडलीय. चित्रपटाच्या एका सीनदरम्यान प्रेक्षकाने चित्रपटगृहाचा पडदा फाडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com