Actor Death : जेष्ठ अभिनेत्याचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा
प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते जेरी अॅडलर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.
जेरी अॅडलर यांच्या निधनाच्या बातमीमुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पडद्यामागे दीर्घकाळ काम केल्यानंतर त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अभिनय करायला सुरुवात केली होती.
Jerry Adler Death : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते जेरी अॅडलर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहते आणि सहकलाकारांनी अभिनेते जेरी अॅडलर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जेरी अॅडलर यांचे मित्र फ्रँक जे. रेली यांनी एक्सवर पोस्ट करत निधनाची माहिती दिली. महान अभिनेता, माझा मित्र जेरी अॅडलर यांचे निधन झाले आहे, असे फ्रँक जे. रेली यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलेले होते.
जेरी अॅडलर यांनी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हीच त्यांच्याबाबतची सर्वात खास गोष्ट मानली जाते. जवळजवळ तीन दशके ते पडद्यामागे राहून काम करत होते. उत्तम रंगमंच व्यवस्थापक आणि दिग्दर्शन म्हणून त्यांनी नाव कमावले होते. त्यांनी 'माय फेअर लेडी' या प्रसिद्ध नाटकासह अनेक ब्रॉडवे प्रॉडक्शनमध्ये काम केले होते.
बरीच वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर जेरी अॅडलर यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. 'द सोप्रानोस' या नाटकामधील हरमन 'हेश' रॅबकिनच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. त्यांनी 'द गुड वाईफ' आणि 'द गुड फाईट' मध्ये वकील हॉवर्ड लायमनची भूमिका साकारून लोकांना आश्चर्यचकित केले होते.
रंगमंचावर काम करताना जेरी अॅडलर यांनी टेलिव्हिजन विश्वातही छाप पाडली. टीव्हीच्या विविध मालिका, शोजमध्ये ते वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले होते. पडद्यामागे आणि पडद्यासमोर अशा दोन्ही ठिकाणी काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे होता. शनिवारी रात्री उशिरा (स्थानिक वेळेनुसार) जेरी अॅडलर यांनी शेवटचा श्वास घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.