Kangana Ranaut: मोठी बातमी! भाजप खासदार कंगना रणौत यांना जीवे मारण्याची धमकी

Kangana Ranaut on Emergency Movie: भाजप खासदार कंगना रणौत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कंगना रणौत यांचा 'इमरजेंसी' चित्रपच प्रदर्शित होण्याआधीच त्यांना धमकी मिळाली आहे.
मोठी बातमी! भाजप खासदार कंगना रणौत यांना जीवे मारण्याची धमकी
Kangana Ranaut Saam tv
Published On

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत तिच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. कंगना यांचा 'इमरजेंसी' चित्रपट रिलीज होण्याआधी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर भाजप खासदार कंगना यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी अशा धमक्यांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया कंगना यांनी दिली आहे. कंगना यांचा 'इमरजेंसी' चित्रपट हा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री कंगना यांनी 'इमरजेंसी' चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. आता तर थेट कंगना यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

मोठी बातमी! भाजप खासदार कंगना रणौत यांना जीवे मारण्याची धमकी
Kangana Ranaut : इंदिरा गांधी फक्त राहुल गांधींच्या आजी नव्हत्या...; कंगना रनौत पुन्हा चर्चेत

'मी धमक्यांना घाबरणारी नाही'

कंगना रणौत यांनी 'इमरजेंसी' चित्रपटावरावरून सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मला कोणी भीती दाखवू शकत नाही. हे लोक मला घाबरू शकत नाहीत. मी या देशात संविधानिक अधिकार कायम ठेवण्यासाठी लढत राहील. प्रत्येत कलाकाराला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. कोणालाही सत्याचा आवाज दाबण्याचा अधिकार नाही. हे लोक कोणालाही धमकी देतील. पण मी घाबरणारी नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया कंगना यांनी दिली आहे.

कंगना पुढे म्हणाली, 'मी घाबरून मागे गेली तर पुढे जाऊन कोणत्याही कलाकाराला पुढे येऊ दिले जाणार नाही. ते कलाकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. आमच्या सोबत या घटना घडल्या आहेत. आम्हाला एक वेगळाच इतिहास शिकवला गेला आहे. आम्ही आता पुन्हा होऊ देणार नाही. देशासाठी आमच्यावर जबाबदारी आहे. मी माझ्या जन्मभूमीतून अन्न आणि जल ग्रहण केलं आहे'.

मोठी बातमी! भाजप खासदार कंगना रणौत यांना जीवे मारण्याची धमकी
Kangana Ranaut: शेतकरी आंदोलनाविरुद्ध केलं वक्तव्य, कंगना रणौत यांना भाजपने सुनावले खडेबोल

'मला नाही वाटत की, माझा चित्रपट अयोग्य आहे. मला नाही वाटत की, लोकांना सत्याचं वावडं आहे. माझ्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जशा होत्या, तशाच आहेत. तुम्ही कोणाचंही वाईट किंवा चांगला असं वर्गीकरण करु शकत नाही. तुम्ही या दृष्टिकोनातून चित्रपट पाहत असाल तर तुमच्यासाठी चित्रपटाचे दरवाजे उघडे आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com