Abhijeet Sawant Video : अभिजीत सावंतच्या लेकीचं संजू राठोडनं केलं कौतुक, म्हणाला...

Abhijeet Sawant Daughter Danced On Shaky Shaky Song : ‘बिग बॉस मराठी 5’ चा उपविजेता अभिजीत सावंत कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याच्या मुलीचे संजू राठोडने कौतुक केले आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Abhijeet Sawant Daughter Danced On Shaky Shaky Song
Abhijeet Sawant VideoSAAM TV
Published On

सध्या सोशल मीडियावर संजू राठोडच्या 'शेकी शेकी' गाण्याने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण यावर भन्नाट व्हिडीओ बनवताना दिसत आहे. संजू राठोडने आजवर अनेक सुपरहिट गाणी केली आहेत. यात 'गुलाबी साडी', 'काली बिंदी' यांचा समावेश आहे. आता या गाण्यावर 'इंडियन आयडल 1'चा विजेता अभिजीत सावंतच्या लेकीने डान्स (Abhijeet Sawant Daughter Danced On Shaky Shaky Song) केला आहे. याचा व्हिडीओ अभिजीतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

परदेशात अभिजीत सावंतच्या लेकीने 'शेकी शेकी' गाण्यावर ठेका धरला आहे. व्हिडीओमध्ये ती गाण्याची हुक स्टेप 'एक नंबर तुझी कंबर' वर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. सध्या अभिजीत सावंत आपल्या कुटुंबासोबत स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहे. आपल्या स्वित्झर्लंड ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ अभिजीतने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात आता त्याच्या मुलीच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिजीत सावंतच्या लेकीच्या व्हिडीओवर संजू राठोड याने खास कमेंट केली आहे. संजू राठोडने (Sanju Rathod) व्हिडीओच्या कमेंटमध्ये “क्युट” लिहून हॉर्ट इमोजी शेअर केले आहेत. अभिजीतच्या लेकीचे डान्स करतानाचे चेहऱ्यावरील क्युट हावभाव नेटकऱ्यांना खूपच आवडले आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

संजू राठोडचे 'शेकी शेकी' गाणे 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात बिग बॉस फेम ईशा मालवीय देखील दिसत आहे. ईशाने पहिल्यांदाच संजूसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'शेकी' गाण्यातील संजू राठोड आणि ईशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे. तर दुसरीकडे अभिजीत सावंतचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Abhijeet Sawant Daughter Danced On Shaky Shaky Song
Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच, ११व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com