Amir Khan: आमिर खानवर लव्ह जिहादचा आरोप; अभिनेता म्हणाला, 'जेव्हाही दोन धर्माचे लोक...'

Amir Khan: आमिर खानने नुकतेच एका मुलाखतीत त्याच्या पीके चित्रपटाबद्दल सांगितले. आमिर खानच्या या चित्रपटाबाबत बराच वाद झाला होता.
Aamir Khan
Aamir KhanSaam Tv
Published On

Amir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खानने नुकताच एका मुलाखतीत त्याच्या 'पीके' चित्रपटाबद्दल सांगितले. आमिर खानचा 'पीके' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा या चित्रपटाबद्दल खूप वाद झाला होता. या चित्रपटाबद्दल आमिर खानवरही टीका झाली होती. आमिर खानच्या चित्रपटावर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता आमिर खानने त्या चित्रपटाबद्दल बोलले आहे.

आमिर खानने लव्ह जिहादवर काय म्हटले

रजत शर्माच्या 'आपकी अदालत' या कार्यक्रमात रजत शर्माने आमिर खानला सांगितले की ट्रोलर म्हणतात की तू लव्ह जिहाद करतोस. ते म्हणतात की पीकेमध्ये तू एका हिंदू मुलीचे पाकिस्तानी मुस्लिमाशी लग्न योग्य ठरवले आहे. यावर आमिर खान म्हणतो, "जेव्हा दोन धर्माचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्या हृदयात प्रेम असते. त्यांना लग्न करायचे असते. ते प्रत्येक वेळी लव्ह जिहाद नसते."

Aamir Khan
Fathers Day Special: 'बाप होण्यापुढे सगळे आनंद ...'; संकर्षण कऱ्हाडेने 'फादर्स डे' निमित्त शेअर केली मर्मस्पर्शी कविता, पाहा व्हिडीओ

आमिर खान पुढे म्हणाला, "जर दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे मन एकत्र आले तर ते मानवतेसाठी उत्तम उदाहरण आहे. ते प्रत्येक वेळी लव्ह जिहाद नाही. जेव्हा दोन मन एकत्र येतात तेव्हा ते धर्माच्या वर असतात."

Aamir Khan
Kajol: 'मी कधीच २० तास काम केले नाही…'; दीपिका पदुकोणच्या ८ तास शिफ्टच्या वादावर काजोलची प्रतिक्रिया

प्रेम ही सर्वात मोठी गोष्ट आहे

आमिर खान पुढे म्हणाला, "मी तुम्हाला सांगतो. माझी बहीण निखत हिचे लग्न संतोष हेगडेशी झाले आहे, तो हिंदू आहे, तर तुम्ही त्याला लव्ह जिहाद म्हणाल का? माझी धाकटी बहीण फरात हिचे लग्न राजीव दत्ताशी झाले आहे, तो हिंदू आहे. माझी बहीण मुस्लिम आहे. तर तुम्ही याला लव्ह जिहाद म्हणाल का? माझी मुलगी आयराने, काही काळापूर्वी नुपूरशी लग्न झाले. प्रेम ही या पृथ्वीवरील सर्वात मोठी गोष्ट आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com