Aamir Khan: 'लाल सिंह चड्ढा'च्या बॉयकटमुळे आमिर खान झाला दु:खी, म्हणाला 'काही लोकांना वाटतं मला भारत...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटाद्वारे चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे
Laal Singh chaddha
Laal Singh chaddha Saam Tv

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटाद्वारे चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी आमिर खानने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटा संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली. यादरम्यान आमिर खानला 'बॉयकट लाल सिंह चड्ढा' ट्रेंडबद्दलही सविस्तरपणे आपले मत मांडले.

Laal Singh chaddha
Ram Setu: कायदेशीर वादात अडकला अक्षय कुमारचा 'राम सेतू'

'बॉयकट लाल सिंग चड्डा' का होताय ट्रेंडिंग ?

वास्तविक, २०१५ मध्ये आमिर खान एका कथित वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. 'आपला देश खूप सहिष्णू आहे, परंतु काही लोक दुष्टपणा पसरवत आहेत', असे अमीर खान म्हणाला होता. एवढेच नाही तर आमिर खानची पूर्व पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव हिने सांगितले होते की, ती आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी देश सोडण्याचा विचार करत आहे. या जुन्या विधानामुळे नेटिझन्स त्यांना हिंदुविरोधी आणि भारतविरोधी म्हणत आहेत.

Laal Singh chaddha
Salman Khan: सलमान खानला मिळाला शस्त्र परवाना; जिवे मारण्याच्या धमकीनंतर केला हाेता अर्ज

'काही लोकांना वाटतं मला भारत आवडत नाही'

सोशल मीडियावर 'बॉयकॉट लाल सिंग चड्ढा'च्या ट्रेंडबद्दल पत्रकारांनी जेव्हा आमिर खानला प्रश्न विचारला त्यावेळी अमीर खान म्हणाला, 'जेव्हा लोक बॉलिवूड आणि 'लाल सिंग चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. खासकरून जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात. कारण त्यांना असं वाटते की मी अशा लोकांच्या यादीत येतो ज्यांना भारत आवडत नाही. पण हे खरे नाही. काही लोक असा विचार करतात हे दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. कृपया माझा चित्रपट पाहा'.

'लाल सिंग चड्ढा' हा हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक...

लाल सिंग चड्ढा बद्दल बोलायचे तर, 'लाल सिंग चड्ढा' हा हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सच्या 'फॉरेस्ट गंप'या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. साऊथ अभिनेता नागा चैतन्यचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट आहे. लाल सिंग चड्ढा याआधी बैसाखीच्या दिवशी रिलीज करण्यात येणार होता, परंतु निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत पुढे ढकलली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com