Ram Setu: कायदेशीर वादात अडकला अक्षय कुमारचा 'राम सेतू'

अक्षय कुमारचा 'राम सेतू' हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु अक्षय कुमारचा 'राम सेतू' हा चित्रपट कायदेशीर वादात अडकला आहे.
Ram Setu Movie
Ram Setu MovieSaam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) त्याचा अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. अक्षय कुमारचे बहुतेक चित्रपट हे अॅक्शन ड्रामावर आधारित असतात. अक्षय कुमारचा 'राम सेतू'(Ram Setu) हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत चर्चा सुरु आहे. परंतु अक्षय कुमारचा 'राम सेतू' हा चित्रपट कायदेशीर वादात अडकला आहे. अलीकडेच, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निर्मात्यांवर चित्रपटातील राम सेतू मुद्द्यांचे 'खोटे चित्रण' केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकसान भरपाईचीही मागणी करणार असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाचे शूटिंग अयोध्या आणि रामेश्वरमसह अनेक ठिकाणी झाले असून हा चित्रपट पहिल्यापासूनच नावामुळे चर्चेत आहे. आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्वीटमुळे 'राम सेतू' या चित्रपटाबाबत लोकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

Ram Setu Movie
Sam Bahadur : 'सॅम बहादूर' बायोपिक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी शेयर केले खास फोटो

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'मी आणि माझे वकील सत्य सभरवाल यांनी अक्षय कुमार आणि कर्मा मीडियावर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय कुमार त्याचा आगामी 'राम सेतू' हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडत आहे. आणखी एका ट्विटमध्ये स्वामींनी अक्षयच्या नागरिकत्वावर हल्ला केला आणि त्याला अटक करण्याबाबतही बोलले.

Ram Setu Movie
कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत दुबईत करतेय वाढदिवस साजरा; 'या' फोटोंमुळे चाहत्यांचा संशय बळावला!

सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले, 'अभिनेता अक्षय कुमार परदेशी नागरिक असल्यास, आम्ही त्याला अटक करण्यास सांगू शकतो आणि त्याला दत्तक घेतलेल्या देशातून बाहेर काढू शकतो'. अक्षयच्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. तो कॅनडाचा नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अक्षयने याबाबत कधीही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

'राम सेतू' या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक पुरातत्व कथेवर आधारित चित्रपट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी २४ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com