सध्या गणेशोत्सवाची सर्वत्रच लगबग पाहायला मिळते. अशातच मालिकेंमध्येही गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले दिसून येत आहे. सध्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवारही सज्ज झालेला आहे. आरती घराघरातली ही ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३’ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे. नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या मिलिंद गवळींनी कार्यक्रमाविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी पोस्टमध्ये म्हणतात, “ “अहम ब्रह्मास्मी” आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला सहज जाणवतात, समजतात, कळतातही, पण बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात. ज्या आपल्या अकलनाच्या पलीकडच्या असतात. आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात, मग आपण त्याला योगायोग म्हणतो, तर कधी कधी चमत्कारही म्हणतो. काही आठवड्यापूर्वी, माझ्या विजू मावशीच्या घरी, म्हणजे नाशिकला पुरकर काकांकडे, ५८ ते ६० ब्रह्मकमळ एकावेळी एकत्र उमलले, त्याचा व्हिडिओ मावशीने पाठवला, एकवेळेला उमललेले इतकी ब्रम्हकमळाची फुलं, हे फारच सुंदर दृश्य होतं ते.”
मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “ते दृश्य डोळ्यासमोर होतं, दोन-चार दिवसांनी, मी पण एक ब्रम्हकमळाचं रोप घरी घेऊन आलो, कधीतरी आपल्याकडेही ब्रह्मकमळ येतील अशा आशेने ते मी आणलं, संध्याकाळी बसून ते एका कुंडीमध्ये लावलं, दुसऱ्या दिवशी सकाळी स्टार प्रवाह मधुन निरोप आला, यावर्षी गणपती महोत्सवामध्ये माझा परफॉर्मन्स आहे असं त्यांनी मला सांगितलं, मी चौकशी केल्यानंतर मला कळलं की दत्तगुरूंच्या आरतीवर माझा एक ॲक्ट आहे. आणि त्यामध्ये मला ब्रम्हाची भूमिका करायची आहे.”
मिलिंद गवळी आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणतात, “मी एका झटक्यात तयार झालो. आणि डोक्यामध्ये विचार आला, काल कुंडीमध्ये लावलेल्या ब्रह्मकमळाचं रोप आणि या ब्रह्म भूमिकेचा काही संबंध असेल का? असेलं ही! असू शकतं! म्हटलं ना बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये अशा घडतात ज्या आपल्या अकलनाच्या पलीकडच्या असतात, there is a divine force which is constantly working for You. गोष्टी घडत असतात, तुमच्या हातात काहीही नसतं तुम्ही फक्त निमित्त मात्र असता. अचानक ध्यानीमनी नसताना ब्रह्माची भूमिका करून झाली आहे आणि आता कुंडीमध्ये लावलेल्या ब्रह्मकमळाच्या झाडाला ब्रह्मकमळ कधी येतील याची वाट पाहतोय. So life is unpredictable and life is also full of surprises.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.