Madhurani Gokhale Viral Video: ९०० भाग पूर्ण होताच अरुंधतीने केली ‘ही’ खास गोष्ट.. सगळ्यांनी केलंय कौतुक

मालिकेने नुकतेच ९०० भागांचा पल्ला पार केला असून मधुराणी प्रभुलकरने एक पोस्ट शेअर केली आहे.
Madhurani Gokhale Viral Video
Madhurani Gokhale Viral VideoInstagram

Madhurani Gokhale Viral Video: मराठी रुपेरी पडद्यावर नेहमीच चर्चेत ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने नुकतेच ९०० भागांचा पल्ला पार केला आहे. नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेची वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. मालिकेत आईचे पात्र साकारणाऱ्या अरुंधतीची अर्थात मधुराणीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. अशातच मालिकेने नुकतेच ९०० भागांचा पल्ला पार केला असून मधुराणी प्रभुलकरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या मधुर आवाजाने गाणे गायले आहे.

Madhurani Gokhale Viral Video
Tiger Vs Pathaan मध्ये शाहरुख सलमानसोबत झळकणार हा हॉलिवूड सेलिब्रिटी; उत्सुकता आणखी वाढली...

९०० भागांचा नुकताच पल्ला पार केला असून १००० भागांचाही लवकरच पार करेल अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. लवकरच मालिका १००० एपिसोड्सचा पल्ला पार करणार आहे. याचे औचित्य साधत, मधुराणी प्रभूलकरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात मधुराणीने ‘ए जिंदगी गले लगा ले’ हे गाणं गायले आहे. सध्या तिचं हे गाणं सोशल मीडियावर बरंच चर्चेत आले आहे.

मधुराणी प्रभुलकरने काल सोशल मीडियावर मालिकेचे ९०० एपिसोड्स पूर्ण झाल्याचे औचित्य साधत तिच्या गोड आवाजात सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, मधुराणी म्हणते, “आई कुठे काय करते चे लवकरच १००० भाग पूर्ण होतील. ९०० भागपूर्ती च्या निमित्ताने आमचे निर्माते राजन शाही सरांनी होम केला होता. आजच्या काळात पार्टी न करता अशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो हे महत्त्वाचे... तर त्या दिवशी उत्स्फूर्तपणे मी गायलेलं हे गाणं… अचानक सापडलं… आज तुमच्यासाठी पेश” असे कॅप्शन मधुराणीने हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Madhurani Gokhale Viral Video
Salman Khan Threat Case Update : सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट, 16 वर्षांच्या 'रॉकी भाई'ने केला होता भाईजानला फोन...

मधुराणीचे हे गाणे ऐकुन चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एक चाहता म्हणतो, “हे गाणं तर खूप वेळा ऐकलंय पण तुमच्या आवाजात ऐकल्यावर अजून जास्त छान वाटलं... कारण तुमचा आवाज हे माझ्यासाठी फक्त आवाज नाही आहे आणि ते काय आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत.” तर आणखी एक चाहता म्हणतो, “तुझ्या आवाजातील हे गाणं ऐकून आम्ही हरवलो.” तर आणखी एक म्हणतो, “किती छान, क्या बात है” याहून अनेक कमेंट्सने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com