Tiger Vs Pathaan मध्ये शाहरुख सलमानसोबत झळकणार हा हॉलिवूड सेलिब्रिटी; उत्सुकता आणखी वाढली...

‘टायगर व्हर्सेस पठान’ मध्ये शाहरुख आणि सलमानसोबत एक हॉलिवूड कलाकारदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Jason Momoa in Tiger Vs Pathan Lead Role
Jason Momoa in Tiger Vs Pathan Lead RoleSaam Tv

Jason Momoa in Tiger Vs Pathan Lead Role: ‘पठान’ ने बॉक्स ऑफिसला एक नवी ऊर्जा आणि एक नवं चैतन्य दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शाहरुखने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून, सध्या शाहरुख या वर्षात आणखी काही चित्रपटांत दिसणार आहे. शाहरुखच्या जोडीला सलमान आल्याने ‘पठान’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असल्याची अनेकदा चर्चा देखील झाली आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘टायगर व्हर्सेस पठान’ मध्ये दिसणार आहे. यांचा कॅमिओ पुन्हा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यांच्या सोबत आणखी एका हॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

Jason Momoa in Tiger Vs Pathan Lead Role
Salman Khan Threat Case Update : सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट, 16 वर्षांच्या 'रॉकी भाई'ने केला होता भाईजानला फोन...

मीडिया रिपोर्टनुसार, ‘टायगर व्हर्सेस पठान’ मध्ये शाहरुख आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाची तयारी सुरू झाली असून निर्मात्यांनी चित्रपटासाठी जबरदस्त पैसा खर्च करणार असल्याचं म्हंटलं आहे. या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म्सने तब्बल ३०० कोटीचं बजेट दिलं असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि सलमान सोबत एका हॉलिवूड सेलिब्रिटीची एन्ट्री होणार आहे. तो सेलिब्रिटी म्हणजे, जेसन मामोआ. जेसन मामोआने ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मध्ये खलनायकाचे पात्र साकारले होते. जेसन मामोआच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांना सिनेमामध्ये काही तरी वेगळं अनोखे पाहायला मिळणार हे नक्की.

सोबतच, मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि सलमान एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असताना, चित्रपटात दोन अभिनेत्री देखील एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत. यश राजच्या स्पाय युनिव्हर्सशी जोडलेल्या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

Jason Momoa in Tiger Vs Pathan Lead Role
Urfi Javed Fashion: माझी फॅशनच माझ्या अंगलट येणार? स्वत:नेच व्यक्त केली भिती...

हृतिक रोशनच्या ‘वॉर २’चं शूटिंग आटोपल्यानंतर, यश राज स्पाय युनिव्हर्सचा एक मोठा भाग असणाऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

यश राज फिल्म्सचा हा सर्वाधिक बिग बजेट चित्रपट असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सलमान आणि शाहरुखचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. शाहरुख खानचा ‘पठान’ ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. सलमान खानचा याच युनिव्हर्समधील ‘टायगर ३’सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com