बच्चन कुटुंबाची सून आता शाहीथाटात; 'पोनियिन सेल्वन' चित्रपटातील ऐश्वर्याचा फोटो व्हायरल

'पोनियिन सेल्वन' या चित्रपटाच्या सेटवरून ऐश्वर्या राय बच्चनचा एक फोटो समोर आला आहे.
Aishwarya Rai
Aishwarya RaiSaam Tv

मुंबई : विश्व सुंदरी बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिच्या 'पोन्नियिन सेल्वन' आगामी चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. या चित्रपटातून ऐश्वर्या राय तब्बल चार वर्षानंतर रूपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. अलीकडेच, तिच्या 'पोनियिन सेल्वन'(Ponniyin Selvan: I) या चित्रपटाचा धमाकेदार टीझरही रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली. चाहते आता या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान ऐश्वर्याचा रायचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aishwarya Rai
चौथ्या स्टेजच्या कॅन्सरने त्रस्त 'केजीएफ' स्टारची प्रकृती दिवसेंदिवस बिकट, शस्त्रक्रियेसाठीही नाहीत पैसे

अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवरून ऐश्वर्या राय बच्चनचा एक फोटो समोर आला आहे. ऐश्वर्याचा हा फोटो इंटरनेटवर धूमाकूळ घालत आहे. व्हायरल फोटोतील ऐश्वर्याचा लूक खूपच सुंदर दिसतो आहे. फोटो तिच्या आगामी 'पोनियिन सेल्वन' या चित्रपटातील आहे. व्हायरल फोटोमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने लाल साडी परिधान केली आहे. तसेच ती क्रू मेंबरसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहे. तिच्या फॅन पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. चाहत्यांना ऐश्वर्याचा हा फोटो प्रचंड पंसतीस उतरला आहे.

Aishwarya Rai
Salman Khan New Film: इंडस्ट्रीत ३४ वर्षे पूर्ण झाल्यावर सलमान खानने केली नवीन चित्रपटाची घोषणा!

ऐश्वर्या राय बच्चन अनेक वर्षांनंतर 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. चित्रपटात ऐश्वर्या चोल राजवंशातील नंदिनीचे पात्र साकारत आहे. अलाकडेच, ऐश्वर्याच्या फर्स्ट लूकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहे.

माहीतीनुसार, ऐश्वर्याचा असा लूक करण्यासाठी निर्मात्यानी ६ महिने अहोरात्र मेहनत घेतली आहे. याशिवाय दागिन्यापासून पूर्ण तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम आणि ऐश्वर्या चौथ्यांदा या चित्रपटाच्या निम्मत एकत्र काम करणार आहेत. पोन्नियिन सेल्वन या बिग बजेट चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट ३० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com