Ram Charan fans fight: रामचरणच्या प्रेमापायी पोरींचा फुल्ल ऑन राडा; सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल...

रामचरणचा चाहता वर्ग सोशल मीडियावर सर्वाधिक आहे. सध्या त्याच्या दोन चाहत्यांचा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
College Girls Fight Over 'RRR' Actor
College Girls Fight Over 'RRR' ActorSaam Tv
Published On

College Girls Fight Over 'RRR' Actor: दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण सध्या ‘RRR’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. त्याच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट मुळ गाणं’चा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. रामचरणचा चाहता वर्ग सोशल मीडियावर सर्वाधिक आहे. सध्या त्याच्या दोन चाहत्यांचा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. अभिनेता रामचरण याच्यासंबंधित कॉलेजमधील दोन तरुणींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

College Girls Fight Over 'RRR' Actor
Ponniyin Selvan 2 Trailer: बहुप्रतीक्षित चित्रपट 'पोनियिन सेल्वन 2' ट्रेलर प्रदर्शित; काही तासातच पार केले 6 मिलियन व्ह्यूज

या व्हायरल व्हिडीओत, दोन्ही मुली RRR फेम रामचरण संबंधित काही मुद्द्यावरून भांडण करता- करता थेट एकमेकींचे केस ओढण्यापर्यंत त्यांचा हा वाद गेलेला पाहायला मिळाला. भांडणाचे नेमके कारण आणि नेमकं कोणत्या महाविद्यालयात हा प्रकार घडला हे कळू शकले नाही, व्हिडिओ आंध्र प्रदेशातील असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे, त्या मुली तेलुगू भाषेत एकमेकींसोबत भांडताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत असून सोशल मीडियावर याच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून, व्हिडिओला नेटकऱ्यांनी सर्वाधिक व्ह्यूज दिल्या आहेत. जरी व्हिडीओ व्हायरल होत असला तरी, नेटकऱ्यांकडून त्या तरुणींना ट्रोल केले जात आहे. “ या मुलींना काही कामं धंदे नाहीत का? कोणासाठी एकमेकींच्या झिंज्या उपटताय.?” अशी एका युजरने कमेंट केली आहे.

College Girls Fight Over 'RRR' Actor
Coffee With Karan 8: ‘कॉफी विथ करण सीझन ८’ लवकरच.. शाहरुख खान करणार शुभारंभ

तर आणखी एक युजर म्हणतो, “जर कामाचा कंटाळा आला असेल तर ही लढाई एकदा आवश्य पहा.” तर दुसरा युजर म्हणतो, “कोणत्याही मुलाने या मुलींच्या भांडणात उडी घेतली नाही हे पाहून आनंद झाला.” तर आणखी एक युजर गंमतशीर पणे म्हणतो, “लढाई पाहण्यासाठी भाषेचा अडथळा नाही.” तर आणखी एक म्हणतो, “दक्षिण चित्रपटाचे फालतू चाहते.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com