Gajar Ashtavinayaka : १०० कलाकार एकत्र येऊन करणार 'गजर अष्टविनायकाचा'

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ 'गजर अष्टविनायकाचा' या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाच्या कथा सांगणार आहेत.
 Gajar Ashtavinayaka
Gajar AshtavinayakaSaam Tv
Published On

मुंबई : गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं लाडकं दैवत आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तिमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी आता स्टार प्रवाहचा परिवारही सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार(Ganesh Chaturthi) गणेशोत्सव २०२२ 'गजर अष्टविनायकाचा' या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाच्या कथा सांगणार आहेत.

 Gajar Ashtavinayaka
Aamir Khan : आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'वर बंदीची मागणी; हायकोर्टात याचिका

प्रत्येक वाहिनीवरील मालिकेत कलाकार(Artist) जवळजवळ सगळेच सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. यावर्षी कोरोना लाट ओसरल्यानंतर निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळं यंदा सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमामध्ये स्टार प्रवाह परिवारातील १०० कलाकार एकत्र येणार आहेत. अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्याच्या माध्यमातून सादर करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत

 Gajar Ashtavinayaka
Urfi Javed: उर्फी जावेदला धमकी; म्हणाली, 'मी कोणाला घाबरत नाही'

स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या कथा सांगत या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे 'गजर अष्टविनायकाचा' हा कार्यक्रम पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल. या कार्यक्रमात गणपतीच्या आवडीच्या पाच गोष्टींवर म्हणजेच दुर्वा, मोदक,उंदीर मामा, जास्वंद आणि शेंदूर यांच्यावर आधारित एक खास गाणं देखील तयार करण्यात आलं आहे. अष्टविनायकाच्या कथांसोबतच युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'गजर अष्टविनायकाचा' हा कार्यक्रम रविवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना त्यांचे लाडके कलाकार खास नृत्याविष्कार सादर करताना दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com