Akola News : दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा... अकोल्यात तुफान राडा; सहा जण गंभीर जखमी

Akola : अकोल्यातील वाशीम बायपास परिसरात न्यू नितीन बारजवळ शुल्लक कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या राड्यात सहा जण गंभीर जखमी झाले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Akola News : दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा... अकोल्यात तुफान राडा; सहा जण गंभीर जखमी
Akola NewsSaam Tv
Published On

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातील वाशीम बायपास परिसरात काल रात्री उशिरा तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून निर्माण झालेला वाद हाता[पायीवर गेला. या घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील न्यू नितीन बार रेस्टॉरंटजवळ रविवारी रात्री तरुणांच्या दोन गटात शुल्लक कारणावरून वाद उफाळला. छोट्याशा कारणावरून सुरु झालेला हा वाद दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा आणि काठ्यांचा वापर यापर्यंत पोहोचला. काही तरुणांनी तर सिमेंटचे खांब उचलून एकमेकांवर तुटून पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाले.

Akola News : दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा... अकोल्यात तुफान राडा; सहा जण गंभीर जखमी
Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

या राड्यात एकूण सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील प्रत्येकी तीन जण गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काही सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

Akola News : दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा... अकोल्यात तुफान राडा; सहा जण गंभीर जखमी
Akola : अस्वच्छतेमुळे आरोग्यमंत्र्याचा दौरा रद्द! आमदारांची आरोग्य विभागावर टीका, सरकारला दिला घरचा आहेर

हा राडा इतका भीषण होता की परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या राड्यानंतर रस्त्यावर दगडी, विटा पडल्याचं चित्र समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणातील गुंडांवर शिक्षा होणार का ? तसेच वारंवार दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीला आळा बसणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com