

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कबूतरबाजीवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. तब्बल ३२ वेळा चाकूने वार करण्यात आले. या हल्लात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला हल्लेखोर मित्रानेच नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून आरोपीने रुग्णालयातून पळ काढला. या घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची ही घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. नरेंद्रनगर ब्लॉकमधील मटियाली गावामध्ये ही घटना घडली. या गावात राहणाऱ्या रायचंद कंडारी यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगितले की, ते आणि त्यांचे कुटुंब गेल्या अनेक महिन्यांपासून मुनिकिरेतीच्या शीशमझाडी भागात राहत आहेत. शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शेजारी राहणारा नरेश ठाकूर यांचा मुलगा अक्षयने त्यांचा ३० वर्षीय मुलगा अजेंद्र याला घरातून बोलावून घेऊन गेला. रात्री ९ वाजेपर्यंत अजेंद्र परतला नाही तेव्हा त्यांनी फोन केला. अजेंद्रने सांगितले की तो खरसरोट येथील दारूच्या दुकानाजवळ आहे.
रायचंद यांनी असेही सांगितले की, रात्री १०.३८ वाजता त्यांना एक फोन आला की अजेंद्रच्या मित्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपी जखमी अजेंद्रला रुग्णालयात घेऊन गेला होता. कुटुंबीयांनी ऋषिकेश येथील सरकारी रुग्णालयात धाव घेतली पण त्यांचा मुलगा तिथे नव्हता. तेथून ते मायाकुंड येथील एका खासगी रुग्णालयात गेले जिथे अजेंद्र गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. रायचंद म्हणाले की, त्यांना पाहून आरोपी अक्षय त्याच्या मित्रांसह पळून गेला.
रायचंद त्याच्या मुलाला एम्समध्ये घेऊन गेला जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रविवारी स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध केला. आरोपीने अजेंद्रवर एकूण ३२ वेळा चाकूने वार केले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय ठाकूर याच्यासह आणखी काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अक्षयला अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.